Friday, November 6, 2020

*शाळा बंद पण शिक्षण आपल्या दारी" अनलॉक लनींग उपक्रम उपयुक्त*

*शाळा बंद पण शिक्षण आपल्या दारी" अनलॉक लनींग  उपक्रम उपयुक्त*
  आदिवासी विकास  प्रकल्प अधिकारी  आशिमा मित्तल
पालघर(प्रतिनिधी) दि 6 :  कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात  सुरक्षितेच्या दृष्टीने आश्रमशाळा बंद आहेत. आश्रमशाळा सुरु करणे आव्हानात्मक असल्यामुळे आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्याकडून जून 2020 मध्ये प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे अनलॉक लर्निग सुर ठेवण्याचा उपक्रम राबविण्याचे निर्देश आहेत. पालघर जिल्हा आदिवासी बहुल असुन प्रकल्प कार्यालय डहाणूचे काही कार्यक्षेत्र अति दुर्गम असल्याने विद्यार्थ्यांना आश्रमशाळेपर्यंत आनण्या ऐवजी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी. शाळा बंद पण शिक्षण आपल्या दारी" अनलॉक लनींग  उपक्रम उपयुक्त  ठरणार असल्याचे.   डहाणू आदिवासी विकास  प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी  आशिमा मित्तल यांनी सांगितले.                            गाव पाड्यावरती आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आश्रमशाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिक, सामाजिक, आरोग्य बिघडू नये यासाठी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचविणे  आवश्यक आहे. अन्यथा यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रक्रिया खंडीत होवून अनुसूचित जमातीचे विद्यार्थी इतर समाजातील विद्यार्थ्यंपेक्षा मागे पडण्याची शक्यता असल्याने सदर प्रकल्प राबिण्यात येत असल्याचे.  आदिवासी विकास   प्रकल्प अधिकारी  आशिमा मित्तल यांनी सांगितले.

सर्वप्रथम इ. 1 ली ते इ. 12 वी पर्यंत तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने विषय निहाय नावीन्यपूर्ण व्हींडिओ ,ऑडिओ यांचे संकलन करून ते प्रत्येक शाळेमध्ये पोहोच करण्यात आले आहे. जेणेकरून शिक्षक आपल्याकडील मोबाईल, लॅपटॉप, संगणकासारख्या साधनांचा वापर करून मुलांना मनोरंजनात्मक शिक्षण उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये प्रकल्प कार्यालयाअंतर्गत कार्यरत 55 अनुदानित व शासकिय आश्रमशाळामधील अंदाजित 29 हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत. यामध्ये प्रत्येक शिक्षकांनी गाव-पाडे विभागुन घेतले असल्यामुळे कोरोना सारख्या परिस्थितीमध्येही शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा स्नेहबंध निर्माण झाल्याचे दिसुन येतो. शिक्षकांनाही आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कौटोंबिक पार्श्वभूमी कशी आहे हे माहीत असल्यामुळे  शिक्षकही अतिशय आनंदाने या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवत आहेत. शाळा कधी सुरु होतील याचा विचार न करता विद्यार्थी आणि शिक्षण यामध्ये खंड पडू नये आणि दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासुन दुर जाऊ नये यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशिर असल्याचे डहाणू आदिवासी विकास  प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी  आशिमा मित्तल यांनी सांगितले .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...