नाशिक येथील गणेश लोहार यांनी आपल्या दोघा सुपुत्रांसह 21 दिवसात पूर्ण केली नाशिक ते कन्याकुमारी सायकल यात्रा.
प्रतिनिधी / नाशिक
नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य गणेश लोहार आणि त्यांचे सुपुत्र वेदांत व अथर्व यांच्यासह 21 दिवसात नाशिक ते कन्याकुमारी असे परतीचे एकूण 3500 कि.मी. अंतर पूर्ण करण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे. शनिवार दि.10 ऑक्टो.रोजी काळाराम मंदिर येथून त्यांनी प्रवास सुरू केला त्यावेळी सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना निरोप दिला. स्वामी विवेकानंदांनी जगाला दिलेले तत्वज्ञान व भारतीय योगशास्त्राचा प्रचार व प्रसार हे उद्दिष्ट समोर ठेवून लोहार यांनी प्रवास सुरू केला. या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की त्यांचा प्रवास पुढील मार्गाने नाशिक येथून सुरु होऊन मंचर, सातारा, कित्तूर, चित्रदुर्ग, सोलम, मदुराई, तिरूनेलवेली ते कन्याकुमारी. तसेच त्याच मार्गाने दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी काळाराम मंदिर येथे त्यांचा परतीचा प्रवास संपन्न झाला. त्यावेळी तेथे त्यांचे कुटुंबीय, सायकलिस्ट परिवार व मित्रपरिवार यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले व त्यांना अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment