Monday, November 2, 2020

*केळवे -शिरगाव पर्यटन विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार-आमदार श्रीनिवास वनगा*

*केळवे -शिरगाव पर्यटन विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार-आमदार श्रीनिवास वनगा*
पालघर(प्रतिनिधी)
पालघर तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असलेले केळवे- शिरगाव पर्यंटन स्थळाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आज आमदार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले. ते केळवे येथे आयोजित केळवे हॉटेल असोसिएशन व पर्यटन विकास संघ यांच्या बैठकीत बोलत होते,
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल  व पर्यटन व्यवसाय पूर्ण पणे विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात शिथिलता आली आहे,निसर्ग रम्य केळवे व परिसरातील पर्यटनास चालना देऊन रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे,त्यादृष्टीने पर्यटक उद्योजकाशी यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी चर्चा केली.
केळवे पर्यटनाच्या दृष्टीने रस्त्याचे विकास,स्कुबा ड्राइव्ह, बॉटर बोट,म्युझियम,नाट्यगृह तसेच स्थानिक उत्पादक साठी विक्री स्टोल उपलब्द करणे,स्थानिक खाद्यपदार्थ, वास्तुनिर्मितीस चालना देणे,जलदुर्गाची डागडुजी व विकास आणि त्यांच्या इतिहास फलक लावणे आदी अनेक मागण्या यावेळी हॉटेल असोसिएशनचे आशिष पाटील, व जेष्ठ हॉटेल व्यावसायिक श्री.जयवंत चौधरी व इतर हॉटेल व्यवसायिक यांनी केली,यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.राजेशभाई शाह,उपजिल्हाप्रमुख श्री.राजेश कुटे,प.स.सदस्य श्रीमती भारती सावे, केळवे सरपंच श्रीमती भावना किणी,उपसरपंच श्री.नितीन राऊत,शिवसेना विभाग प्रमुख उमेश पालेकर,शाखाप्रमुख तुषार पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. चौधरी आदी यावेळी उपस्थित होते,
दरम्यान लवकरच आपण राज्या चे पर्यटन मंत्री ना.आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन जास्तीत जास्त  विकासनिधी साठी प्रयत्न करू असे आमदार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले,

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...