*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक:- ०५.१०.२०२०
वार :- सोमवार
संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
● कोरोना लशीचे ४०-५० कोटी डोस उपलब्ध करून २०२१ च्या जुलैपर्यंत २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण केले जाणार : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा आशावाद
● नवे कायदे हिताचे असतील तर आंदोलने का सुरू आहेत; राहुल गांधी यांचा सवाल; कोरोना साथ चालू असताना हे कायदे मंजूर करण्याची सरकारला घाई का झाली
● कृषी कायद्यांचे विरोधक हे मध्यस्थांचे दलाल; पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा आरोप
● पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांविरुद्ध मोहीम; घातपाती पथकातील दोघांना अटक; माखन याने दिलेल्या माहितीनुसार तो कॅनडा येथील हरप्रीत सिंग याच्या संपर्कात होता
● हाथरसमध्ये बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी रविवारी पोलिसांचा सौम्य लाठीमार
● दिवसभरात राज्यात १३ हजार ७०२ नवे कोरोनाबाधित आढळले तर, १५ हजार ४८ जण कोरोनामुक्त; राज्याचा रिकव्हरी रेट ७९.६४ टक्क्यांवर पोहचला
● कर्नाटकचे सांस्कृतिक व पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांनी पदाचा दिला राजीनामा; त्यांची नुकतीच भाजपच्या सरचिटणीसपदी निवड केली होती
● डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधारणा; चार मिनिटांच्या संदेशात ट्रम्प यांनी पुन्हा निवडणूकजिंकण्याचा विश्वास व्यक्त केला
● IPL 2020 : चेन्नईचा पंजाबवर १० गडी राखून दणदणीत विजय
● अभिनेता सलमान खानने ६ महिन्यांनंतर केली 'राधे' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात; इन्स्टाग्रामवर शेअर केला खास फोटो
No comments:
Post a Comment