*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ०४.१०.२०२०
वार :- रविवार
● हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश
● “अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी”; हाथरसमधील पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी व प्रियंका गांधींनी दिली प्रतिक्रिया
● हाथरसमधील मुलीच्या कुटुंबीयांना सीआरपीएफची सुरक्षा पुरवा; शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे राष्ट्रपतींना पत्र
● अनलॉक ५ : हॉटेल, उपहारगृहं, बारसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; ५ ऑक्टोबरपासून उपहारगृहे, बार सुरू करण्यास परवानगी
● बिहार निवडणूक : महाआघाडीतील जागा वाटपाचा पेच सुटला; राजद १४४, काँग्रेस ७० जागा लढवणार; निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार
● मध्य प्रदेश : अत्याचाराची तक्रार न नोंदवल्याने अधिकारी अटकेत; नरसिंगपूर जिल्ह्य़ात महिलेची पोलिसांनी ४ दिवस तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे तिने आत्महत्या केली
● दिवसभरात राज्यात १४ हजार ३४८ नव्या बाधितांची नोंद; २७८ जणांचा मृत्यू, २४ तासांमध्ये राज्यात १६ हजार ८३५ जणांची कोरोनावर मात; अडीच लाखांपेक्षा अधिक रूग्णांवर उपचार सुरू
● ट्रम्प यांच्यावर रेमडेसीवीरचे उपचार; डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आहेत
● आयपीएल २०२० : दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट राईडर्सवर १८ धावांनी विजय
● बॉलिवूडची 'देसीगर्ल' अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासच्या नावावर आणखी एक विक्रम; प्रियांकाचे आत्मचरित्र 'अनफिनिश्ड' अमेरिकेच्या 'बेस्टसेलर' यादीत!
No comments:
Post a Comment