"दिग्गज वार्ताहर "बातम्या
दिनांक:- १०.सप्टेंबर २०२०
वार :- गुरुवार
● भारत, रशिया आणि चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक; शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) मॉस्कोत होणाऱ्या बैठकीचे निमित्त
● राफेलचा आज हवाई दलात समारंभपूर्वक होणार समावेश; राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपरिक सलामी
● भारतातील बालमृत्यूचा दर घटूनही स्थिती वाईटच; जगातील पाच वर्षांखालील मुलांचे एक तृतीयांश मृत्यू हे भारतात
● मोदी सरकारने घेतलेल्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात BPCL च्या ४८०० कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सरकार २४ हून अधिक कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत
● एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून जाहीर; प्रवेशपत्र वेबसाईटवर उपलब्ध
● राज्यात दिवसभरात २३,८१६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले; १३,९०६ रुग्णांना डिस्चार्ज; ३२५ रुग्णांचा मृत्यू
● काबूलमध्ये अफगाण उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्यावरील हल्ल्यात १० ठार; अफगाणिस्तानाचे पहिले उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह हे किरकोळ भाजले
● डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी नामांकन; इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील या देशांमधील शांतता करारासाठी मध्यस्थी केल्याबद्दल नामांकन
● अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जेनिफर ब्रॅडी प्रथमच उपांत्य फेरीत; पुरुष एकेरीत जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि स्पेनचा पॅब्लो कॅरेनो बुस्टा यांचे विजय
● निर्माती एकता कपूरच्या घरावर दगडफेक; वेब सीरिजमधील 'त्या' सीनमुळे प्रेक्षक संतापले; एकता कपूरची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात
No comments:
Post a Comment