डॉ मनोज शेटे पोलिटेक्निल कसारा महाविद्यालयावर कारवाई करा.
डॉ अभय वाघ संचालक (संचनालाय तंत्र शिक्षण) यांच्या कडे लेखी पत्रा द्वारे
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे ग्रा ची मागणी.
गेल्या शैक्षणिक वर्ष 2017-18 व 2018-19 ची विद्यार्थी नी संपूर्ण फी भरून ही सुद्धा वर्षभरा पासून विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहिले आहेत. शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत. टेस्ट झाल्या नाही त्यामुळे बहुतेक विद्यार्थीना महाविद्यालया च्या आठमुद्या धोरणा मुळे केटी लागल्या आहेत.हे सर्व असतानाच डॉ मनोज शेटे महाविद्यालय बंद झाले असे मनोज शेटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितल्या मुळे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली होते कारण जे पास झालेत किंवा ज्यांना 1 केटी अश्या विद्यार्थीना पाठपुराव्या मुळे व जी आर प्रमाणे नो ड्युज प्रमानपत्र मिळाले पण ज्यांना 2 ते 5 पर्यंत केटी लागल्या आहेत.महाविद्यालय पण बंद झालं आहे.सदर त्याच इमारतीत खासगी आय टी आय सुरू करण्यात आलं आहे.जे की नियमात बसत नाही. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी काय करावे हे कळत नव्हते.शेवटी हे सर्व विद्यार्थी आपले प्रश्न घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संतोष साळवी यांच्या कडे मदतिसाठी आले.संतोष साळवी यांनी विद्यार्थ्यांचा संपुर्ण विषय समजून घेऊन ते विद्यार्थीना घेऊन डॉ मनोज शेटे महाविद्यालया चे संचालक यांची भेट घेऊन सदर विषयावर सविस्तर चर्चा केली.शेटे यांनी खोट सांगून संतोष साळवी व विद्यार्थ्यांची दिशा भूल केली. शेवटी आज या सर्व विषया ला वाचा फोडण्यासाठी व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी डॉ अभय वाघ संचालक (संचनालाय तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य) यांची भेट घेतली.सर्व परिस्थिती त्यांना लेखी पत्राच्या माध्यमातून सांगितली.व सदर विषयात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.त्यांनी तात्काळ यावर चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल अस सांगितले आहे.
प्रतिनिधि - गिरीश देव भिवंडी
No comments:
Post a Comment