Tuesday, September 8, 2020

ब्रह्मानंद नगर विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा मनसेकडून सत्कार सोहळा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना,   भिवंडी शहर. 
दिनांक 8सप्टेंबर 2020
          *ब्रह्मानंद नगर विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा मनसेकडून सत्कार सोहळा*
             कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण भिवंडी शहर व ग्रामीण गांजलेली असताना या काळात सफाई कामगारांनी जीवावर उदार होऊन सुट्टी न घेता आपला परिसर सतत स्वच्छ ठेवला. याचे भान ठेवून व त्यांच्या कर्तव्याची  जाणीव ठेवून मनसे भिवंडी शहरचे पदाधिकारी श्री सुशील आवटे साहेबांनी व त्यांच्या सहकार्यांनी आज ब्रह्मानंद परिसरातील सर्व सफाई कामगार व अधिकारी वर्ग यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसे भिवंडी शहर अध्यक्ष श्री मनोज वामन गुळवी साहेब होते. तसेच मनविसेचे उपशहर संघटक  महेश मिरजे साहेब, सहसचिव सुनील नाईक साहेब व इतर मनसे सैनिक आणि स्थानिक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. 
   जय मनसे.

प्रतिनिधि- गिरीश देव

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...