Monday, September 7, 2020

कोविड 19 ची परिस्थितीच भान ठेवून या वर्षी फी वाढ करू नये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी



 कोविड 19 ची परिस्थितीच भान ठेवून या वर्षी फी  वाढ करू नये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी.


भिवंडी मधील नामांकित एन इ एस ( NES ) इंग्लिश मिडीयम प्री प्रायमरी स्कुल मधून गेल्या काही दिवसापासून पालकांच्या मोठ्या प्रमाणात फी वाढी संदर्भात तक्रारी येत होत्या.त्या तक्रारींची ची दखल घेऊन आज *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संतोष साळवी* भिवंडी पश्चिम शहर अध्यक्ष श्री सचिन पाटील भिवंडी पुर्व शहर अध्यक्ष योगेश धुळे उपशहर अध्यक्ष महेश मिरजे उपतालुका अध्यक्ष हर्षद पाटील विभाग अध्यक्ष गिरीश देव यांच्या शिष्टमंडळाने एन इ एस इंग्लिश स्कुल चे सचिव अस्वले सर व मुख्यध्यापक कोलगावकर सर यांची भेट घेऊन पालकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. त्या प्रश्ननावर सविस्तर सकारत्मक चर्चा झाली. व येत्या 15 दिवसात फी वाढ,ऑनलाइन अभ्यास क्रम यावर निर्णय होऊन विद्यार्थी व पालकांना फी वाढीत सूट मिळेल हीच अपेक्षा व्यक्त केली आहे.या विषया च्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष श्री संतोष साळवी यांनी पालकांना आव्हान केले आहे की सध्याच्या परिस्थितीत कोणतीही शाळा,किंवा व्यवस्थापन आपालकांकडे फी साठी तगादा लावत असेल.किंवा फी वाढ करत असेल तर त्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.आम्ही आपल्या सोबत आहोत.



No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...