Sunday, September 6, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटरच्या परीसरात मनाई आदेश

* दिग्गज वार्ताहर **:           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  १०० मीटरच्या  परीसरात मनाई आदेश*

पालघर 5 :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोको करण्यासाठी वापरण्यत येणारे  ध्वनीक्षेपक यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  १०० मीटरच्या  परीसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ ,  यांनी लागू केला  आहे.  

     वरील  कारणामुळे  निर्माण होणाऱ्या गजबजाटात कार्यालयात काम करणे अशक्य होते . तसेच या कार्यालयासमोरील रस्त्यालगतची जागा खाजगी असून ती निमुळती असल्याने सदर ठिकाणी मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोकोकर्ते यांनी मंडप उभारल्याने अथवा ते सदर ठिकाणी उभे राहील्याने सदरच्या जागेवरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही . तसेच जिल्हाधिकारी कार्यालय हे खाजगी इमारतीत असल्याने व त्यासमारे उपोषणकर्ते , आंदोलनकर्ते यांचेसाठी मंडप उभारणे अथवा उभे राहणेकरीता पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने तसेच या भागात रासायनिक कंपन्या असल्याने त्यांचे अवजड वाहनांची ये - जा होत असल्याने वाहनांचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता , सदर जागेत मोर्चे , उपोषणे , धरणे , रास्ता रोको व आंदोलनकर्ते यांना जिल्हाधिकारी कार्यालय , पार्श्वनार्थ ९ इमारत , बिडको नाका , नवली , ता.जि.पालघर पासून १०० मीटरचे परीसरात प्रवेश करण्यास जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. 

 फौजदारी प्रक्रीया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ ( १ ) ( २ ) ( ३ ) अन्वये कार्यालयापासून १०० मीटरचे परीसरात विवीध राजकीय पक्ष व विविध संघटना तसेच इतर व्यक्ती यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोको करण्याऱ्या व्यक्तींना सार्वजनिक रितीने घोषणा देणे , गाणी म्हणणे , ध्वनीक्षेपक ( लाऊडस्पिकर ) सूरु ठेवणे , वाद्य वाजवणे कार्यालयासमोर मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोको करण्याकामी प्रवेश करण्यास दि .०५ / ० ९ / २०२० रोजी ००.०१ वा.पासून ते दि .०३ / ११ / २०२० रोजी २४.०० वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आला  आहे . 
सदरचा मनाई आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांकरीता शासकीय , निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी , विविध उपक्रमांकरीता आमंत्रित करण्यात येणारे शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी व खाजगी व्यक्ती , शासकीय कामकाजानिमित्त येणारे नागरीक ,

फौजदारी प्रक्रीया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ ( १ ) ( २ ) ( ३ ) अन्वये राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या व्यक्ती , तसेच विवीध राजकीय पक्ष व विविध संघटना , तसेच इतर व्यक्ती यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोको करणाऱ्या ज्या व्यक्ती जिल्हाधिकारी यांना निवेदन देणेकामी येणेकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागाची परवानगी घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत येतील अशा ५ पेक्षा कमी संख्येने येणाऱ्या व्यक्ती यांना सदरचा मनाई आदेश लागू राहणार नाही .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...