🚩 *आसनगाव शहरातील अनेक महिला आणि तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश* 🚂
भिवंडी (गिरीष देव)आसनगावमधील पाणी, रस्ते, गटारी व इतर अनेक समस्यांना कंटाळून आज अनेक महिला व तरुणांनी श्री राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे पक्षावर विश्वास ठेवत आज मनसेत जाहीर प्रवेश केला.
जिल्हा संघटक श्री मदन पाटील आणि तालुकाध्यक्ष श्री जयवंत मांजे यांच्या मार्गदर्शनाखाली, मनसे आसनगाव शहर अध्यक्ष श्री अविनाश चंदे यांच्या नेतृत्वाखाली, मनसे महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ. नयना भोईर मॅडम यांच्या हस्ते या महिलांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी सौ. वनिता निचिते यांची आसनगाव मनसे महिला शहर अध्यक्ष पदी आणि सौ. तृप्ती माळी यांची शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तर श्री रविकांत बोंबे यांची मनसे आसनगाव शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी दिलीप भोपतराव जिल्हा उपाध्यक्ष,जिल्हा सचिव राकेश वारघडे ,रोजगार जिल्हा अध्यक्ष रुपेश गुजरे ,भिवंडीचे नरेश शेलार , मनविसे तालुका अध्यक्ष विजय भेरे ,तालुका सचिव जयवंत भोईर ,तालुका उपाध्यक्ष दिनेश वेखंडे ,तालुका उपाध्यक्ष शशी पुरुभे , संजय पाटील तालुकाध्यक्ष माथाडी सेना ,नडगाव ग्रामपंचायत सदस्य विकी मांजे ,शहर अध्यक्ष विनोद पाठारी , मनविसे शहर अध्यक्ष सिद्धू शिंदे ,शहर सचिव कौस्तुभ लिमये ,मनीष शेट्ये उपाध्यक्ष,
जब्बार शेख उपाध्यक्ष ,आसनगाव
सचिन भानुशाली सरचिटणीस आसनगाव, तुषार अभंगे मनवीसे अध्यक्ष आसनगाव, विनोद चंदे, पुंडलिक निचिते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशाने आसनगाव शहरात मनसे ची ताकद निश्चितच वाढल्या चे दिसून आले.
🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
No comments:
Post a Comment