"दिग्गज वार्ताहर " बातम्या
दिनांक :-१३.सप्टेंबर २०२०
वार :- रविवार
● कोरोनाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी घोषणा; ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ चा दिला नारा
● छायाचित्र घेतल्यास विमानोड्डाणास दोन आठवडे स्थगिती; हवाई वाहतूक मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कोणालाही विमानात छायाचित्र काढण्यास परवानगी नाही
● दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांच नाव; जेएनयू आणि जामियाच्या विद्यार्थ्यांचाही आरोपींमध्ये समावेश
● पाच अपहृत तरुणांची चीनकडून सुटका; पाचही जणांना कोरोना निर्बंधांनुसार १४ दिवसांकरिता विलगीकरणात
● राज्यात दिवसभरात आढळले २२ हजार कोरोनाबाधित; ३९१ रुग्णांचा मृत्यू; आजचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७०.०२ टक्के तर मृत्यूदर २.८१ टक्के
● ब्रिटनमध्ये पुन्हा सुरु झाल्या ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या; भारतात मंजुरीची प्रतीक्षा; जगभरात थांबवण्यात आल्या होत्या चाचण्या
● संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत कोविड बहुराष्ट्रीय सहकार्य ठराव मंजूर; भारताचा पाठिंबा; अमेरिका-इस्रायलचा विरोध
● राज्यात २४ तासांत आणखी ४८५ पोलीस कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू ; कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या १८ हजार ८९० वर
● अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: ग्रँडस्लॅम क्षितिजावर आज नव्या ताऱ्याचा उदय; अलेक्झांडर झ्वेरेव्ह अंतिम फेरीत डॉमिनिक थिमशी भिडणार
● बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि जॉन अब्राहम 'पठाण' चित्रपटात एकत्र झळकणार; यशराज फिल्मला लवकरच 50 वर्षे पूर्ण होणार
No comments:
Post a Comment