Saturday, September 12, 2020

भिवंडीत ग्रामीण भागात गुन्हेगारीला उधाण 21 वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या

*भिवंडीत ग्रामीण भागात गुन्हेगारीला उधाण 21 वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या*
भिवंडी( गिरीष देव)  - भिवंडी मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहिती नुसार 21 वर्षीय मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे . त्याच्या जवळीक असलेल्या मित्रांनीच त्याची हत्या केली आहे असं प्राथमिक अंदाज  तसेच सूत्रांची माहिती समोर येत आहेत . परंतु ह्या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तसेच भीतीचे वातावरण तयार झाले आहे . भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावातील आकाश नारायण शेलार वयवर्ष 21 या तरुणाची गळा आवळून आणि नंतर वार करून हत्या करण्यात आली आहे शेलार दाम्पत्याला एकुलता एक मुलगा होता त्याची अश्या प्रकारे हत्या झाल्या मुले आई  - वडिलांना मोठा धक्का बसला आहे . 
      या प्रकरणात अन्यात मित्रांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास हा पोलिसांकडून सुरू आहे अशी माहिती मिळाली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आकाश हा जिंदाल कंपनीत कमला होता . आरोपींनी त्याला फोन  शेतात बोलवून घेतलं आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली . या घटनेनंतर पोलिसांना प्रचारण करण्यात आले आणि यावर पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद केली तसेच आकाश चा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी नजीक असलेल्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तर पोलिसांनी पुढील तपाससुरू केला आहे  आहे आणि आजून तरी कारण अस्पष्ट आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...