*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- १४.सप्टेंबर २०२०
वार। :- सोमवार
● जानेवारी 2023 मध्ये येणार कोरोना लस, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती; हायरिस्क असणाऱ्य़ांना प्रथम प्राधान्य दिले जाणार
● ‘हातानं मैला साफ करण्यास प्रतिबंध’ कायदा होणार अधिक कठोर; केंद्र सरकार आणणार सुधारणा विधेयक
● पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट; पाच खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; अनेक मुद्यांमुळे अधिवेशन ठरणार वादळी
● कोरोनाने जुलैमध्ये देशांतर्गत विमान प्रवासी तब्बल 82 टक्क्यांनी घटले; जुलै महिन्यात सुमारे 21 लाख 7 हजार प्रवाशांनी केला देशांतर्गत विमान प्रवास
● खतांच्या उत्पादनात भारत येत्या दोन वर्षांत म्हणजे 2023 पर्यंत स्वयंपुर्ण होणार; केंद्रीय खत आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांचा विश्वास
● दिल्ली दंगल प्रकरण; JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक; उमर खालिदला बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली
● राज्यात रविवारी कोरोनाचे 22,543 नवे रुग्ण आढळले असून, गेल्या 24 तासांत 416 जणांचा मृत्यू; मुंबईत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ
● परदेशी पत्रकारांवर ऑस्ट्रेलियात निर्बंध; ऑस्ट्रेलियाच्या एका पत्रकारास चेंग लेई प्रकरणात ऑगस्टमध्ये चीनच्या गुप्त छळछावणीत टाकले होते
● भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतची बंदी संपुष्टात; स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असल्याचे ३७ वर्षीय श्रीशांतने केले होते स्पष्ट
● मराठी दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या 'द डिसायपल'चा डबल धमाका, व्हेनिस महोत्सवात 'क्रिटिक्स'सह सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार; युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय दिग्दर्शक
No comments:
Post a Comment