Sunday, September 13, 2020

सकल मराठा समाज पालघर जिल्हा* पालघर (बाबा साहेब गुंजाळ)पालघर मध्ये सकल मराठा समाज आक्रमक, जिल्हा समन्वयक यांच्या बैठकीत सरकार विरोधात ठराव पास

*सकल मराठा समाज पालघर जिल्हा* पालघर (बाबा साहेब गुंजाळ)पालघर मध्ये सकल मराठा समाज आक्रमक, जिल्हा समन्वयक यांच्या बैठकीत सरकार विरोधात ठराव पास.

पालघर दिनांक 14 सप्टेंबर 


सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली गेल्यामुळे राज्यभरात सकल मराठा समाज प्रचंड संतापलेला आहे.  राज्यात सर्वत्र तालुका गाव तसेच जिल्हा पातळीवर  सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा यांची बैठक सत्र सुरू असून या बैठकीत मध्ये सकल मराठा समाजाचे विविध ठराव पारित केले गेले असून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचा ठराव पास केला.  सुप्रीम कोर्टात समाजाची बाजू भक्कम पणे न मांडल्याने राज्य सरकार मराठा  समाजाच्या गंभीर नसेल तर आंदोलन  करून सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे असे मत मराठा समाजात दिसून येत आहे.



     13 सप्टेंबर 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता पालघर जिल्ह्यातील प्रमुख समन्वयक यांची मीटिंग ऑनलाइन पद्धतीने पार पडली यावेळेस पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून समन्वयक यांनी सरकारच्या विरोधात ठराव पास केले.15 सप्टेंबर 2020 सायंकाळी पाच वाजता बोईसर येथील पीडी इंडस्ट्रियल इंटर प्राइजेस प्रा.ली.,J203,(महवीर चेंबर) सुझुकी शोरुम, एमआयडीसी तारापूर याठिकाणी जिल्हास्तरीय मीटिंग घेण्याचे ठरले असून पुढील ठराव पास झाले आहे.


1. शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी शैक्षणिक प्रवेशावर बंदी बाबतचा निर्णय ज्या तत्परतेने घेतला त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला व शालेय शिक्षण फी संदर्भात वेळ काढून धोरण अवलंबले यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा.

2. राज्य सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण कायम ठेवण्याबाबत तात्काल आवश्यक ती पाऊले उचलावीत !

3. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सर्व मराठा समाज तीव्र नाराज असुन ही नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्रीमहोदय व विरोधीपक्ष नेते हे जेव्हा पालघर जिल्ह्यामध्ये शासकीय दौऱ्यावर येथील तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवन्यात यावेत.

4. संपुर्ण पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक घेऊन समन्वयकांशी चर्चा करून आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल !

5. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कोणत्याही विभागात नोकरभरती करू नये !

6. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना एसईबीसी च्या कोट्या मधून या वर्षासाठी प्रवेश मिळावा व शासकीय नोकरीमध्ये ज्यांची आरक्षणा मधून निवड झाली आहे त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावे (आरक्षणा अंतर्गत)

7.  दिनांक 14 रोजी पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा बांधवांची बैठक घेण्यात यावी व व त्या बैठकीतील ठराव मंगळवार दिनांक 15 रोजी बोईसर येथील बैठकीमध्ये मांडावेत जेणेकरून पालघर जिल्ह्यामधील आंदोलनासंदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेणे शक्य होईल.

हर हर महादेव.....

सकल मराठा समाज - पालघर जिल्हा

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...