"दिग्गज वार्ताहर" दिनांक :- 04 सप्टेंबर 2020
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत
लघुउद्योग व व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध
पालघर दि. 04 :- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत लघुउद्योग व व्यवसायाकरिता कर्ज पुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने सन 2020-21 या वित्तीय वर्षांकरिता विविध योजनांचे पालघर जिल्हा कार्यालयाकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत. यामध्ये 20% बीज भांडवल योजना, रु. 1.00 लाखापर्यंत थेट कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनांचा समावेश आहे. रु. 1.00 लाखापर्यंत थेट कर्ज योजनेकरिता अर्जदारांचा सिबिल स्कोअर किमान 500 इतका असणे बंधनकारक आहे. ऑनलाईन योजनेसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटवर नोंदणी करुन अर्ज भरता येईल यांची नोंद घ्यावी.
सन 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये योजनानिहाय आर्थिक व भौतिक उद्दिष्ट खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे.
1) 20% बीज भांडवल भौतिक 50 आर्थिक (रु. लाखात) 37.50
2) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (रु. 10.00 लाखापर्यंत) भौतिक 140 आर्थिक (रु. लाखात) 159.60
3) गट कर्ज व्याज परतावा (रु. 10.00 लाख ते रु. 50.00 लाखापर्यंत) भौतिक 25 आर्थिक (रु. लाखात)
143.75
4) थेट कर्ज योजना (रु. 1.00 लाखापर्यंत) भौतिक 100 आर्थिक (रु. लाखात) 100.00
अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या., खोली क्र. 102, मॉक्स गोकुळ बिल्डिंग, सर्व्हे. नं. 78, प्लॉट नं. 7, औदुबंर अपार्टमेंट समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, पालघर (पूर्व) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आर. एम. मेश्राम, जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
**********
"दिग्गज वार्ताहर" दिनांक :- 04 सप्टेंबर 2020
सुधारित :
पालघर जिल्ह्यात 14 सप्टेंबर
पर्यंत मनाई आदेश लागू
पालघर दि. 04 :- पालघर जिल्हयात विविध राजकीय पक्ष व संघटना यांचे कडुन त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे, म्हणून पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 14 सप्टेंबर 2020पर्यंत खालील बाबींसाठी जिल्हादंडाधिकारी पालघर, यांनी मनाई आदेश लागु केला आहे.
1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी
वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे,
2) कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,
3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे
किंवा तयार करणे.
4) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
5) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
6) ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे.
सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागू असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरीष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागु असणार नाही.
*****
"दिग्गज वार्ताहर" दिनांक :- 04 सप्टेंबर 2020
एकलव्य मॉडेल रेसिडेशियल स्कुल प्रवेश प्रक्रिया
वर्ष 2020-21 करिता 15 सप्टेंबर अंतिम मुदत
पालघर दि. 04 :- अनुसुचित जमातीच्या विदयार्थांना, सन 2020-21 करिता एकलव्य मॉडेल रेसिडेशियल स्कुल प्रवेश परिक्षा ऑनलाइन होणार होती. त्याकरिता विदयार्थांचे ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरलेले आहेत. परंतु कोव्हिड -19 चा प्रादुर्भावामुळे सदरच्या परिक्षा होवु शकल्या नाहीत. आता शासनाने असा निर्णय घेतला आहे कि सदर विदयार्थाचे परिक्षा न घेता त्यांचा सन 2019-20 च्या प्रथम सत्र परिक्षेच्या गुण पत्रकावरुन प्रवेश यादी तयार करुन विदयार्थांना प्रवेश देण्याचे ठरले आहे.
खालील तपशिलाप्रमाणे गुणपत्रक लिंकवर अपलोड करावयाचे आहे
प्रवेश घ्यावयाची इयत्ता गुण व गुणपत्रकांची आवश्यकता शैक्षणिक वर्ष 2019-20 1) इ.6 वी साठी इ.5वी प्रथम सत्र 2) इ.7 वी साठी इ.6 वी प्रथम सत्र 3) इ.8 वी साठी इ.7 वी प्रथम सत्र 4) इ.9 वी साठी इ.8 वी प्रथम सत्र
प्रथम सत्र परिक्षेचे गुण पत्रकावरुन प्रवेश दिला जाणार आहे. सदर गुण पत्रक 900 गुणांचे असावे (मराठी , इंग्रजी , हिंदी , गणित , विज्ञान , स.शास्त्र , चित्रकला , शारिरीक शिक्षण , कार्यानुभव) असे 9 विषयांचे 900 गुणांचे गुणपत्रक तयार करावे व त्यापैकी गुणदान आकारिक मुल्यमापन मुल्यमापन नोंदवहया वरुन गुणदान करावे कोणत्याही परिस्थितीत गुणपत्रकात श्रेणी देवु नये श्रेणी दिल्यास प्रवेश फॉर्म बाद होईल याची नोंद घ्यावी.जर कला शारिरीक शिक्षण कार्यानुभव यांची परिक्षा 50 गुणांची घेतली असल्यास त्याचे गुण दुप्पट करावे.
प्रवेश फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरावा. प्रवेश फॉर्म सोबत त्या त्या इयत्तेचे प्रथम सत्राचे गुणपत्रक स्कॅन करुन अपलोड करावे.अपलोड करण्यासाठी mtpss.org.in या लिंकवर भर ची आहे.
यापुर्वी परिक्षेसाठी ज्या विदयार्थांचे आवेदन पत्र भरले आहे त्या विदयार्थांचे प्रवेश फॉर्म भरावे. काही अडचण असल्यास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणु जि.पालघर या कार्यालयाशी संपर्क साधावे प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 15/9/2020 आहे. प्रवेश फॉर्म भरल्या नंतर सदर विदयार्थांची नावे या कार्यालयास कळवावे. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणु यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
***********
No comments:
Post a Comment