Monday, September 13, 2021

मा.श्री राजेश पाटील आमदार, यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर येथे स्वच्छता अभियान संपन्न.

मा.श्री राजेश पाटील आमदार, यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर येथे स्वच्छता अभियान संपन्न.
पालघर ( हिरालाल लोखंडे ) 
 
दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी बोईसर येथे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च आॅफ गाॅड बोईसर शाखा आयोजित, विश्व पर्यावरण सफाई अभिनय / स्वच्छता अभिनय आयोजित करण्यात आलेले. या स्वच्छता मोहिमेत वर्ल्ड मिशन सोसायटी आॅफ गाॅड या संस्थेचे नाशिक, मुंबई, वसई आदी विभागातून जवळपास २०० ते २५० अनुयायी स्वच्छता अभियानात भाग घेण्यासाठी आलेले.या प्रसंगी मा. श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा यांनी स्वच्छता अभियानासाठी आलेल्या अनुयायांना / उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, आप आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आवाहन केले. 
     या स्वच्छता मोहिमेत बहुजन विकास आघाडीचे श्री विश्वनाथ घरत पालघर जिल्हा उपाध्यक्ष, श्री प्रभाकर पाटील तालुका अध्यक्ष, श्री अविनाश चुरी जेष्ठ कार्यकर्ते , श्री अनिल खंडारे, वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च आॅफ गाॅड चे श्री विरेंद्र सिंग, श्री रोहित जाधव आदि मान्यवर तसेच बहुजन विकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

1 comment:

  1. आम्ही बोईसर रेल्वे स्टेशन समोर अशाच कार्यक्रमाची अपेक्षा करतो

    ReplyDelete

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...