Monday, September 13, 2021

कोरे येथील आदर्श समाज सेवा गणेशोत्सव मंडळा नवीन आदर्श

*कोरे येथील आदर्श समाज सेवा गणेशोत्सव मंडळा नवीन आदर्श*
पालघर(प्रतिनिधी)
कोरे ता.पालघर येथील गावातील बहिणी आणि भावांनी मिळून बांधलेल्या सभागृहात दरवर्षी
गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
आदर्श समाज सेवा मंडळ कोरे,
एडवन - कोरे, जिल्हा पालघर, सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ हे,
वर्ष ५१ वे वर्ष असून, या निमित्त टाकाऊ वस्तू तून टिकाऊ  असा अनोखा आरास मंडळाच्या सदस्यांनी तयार केला  पर्यावरण पूरक श्री गणेशाची  शाडूमातीची श्रींची मूर्ती स्थापन करण्यात आली.यावेळी
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि श्री च्या विसर्जनास येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याचे पाणी वाटप असे विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले,दरम्यान करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे योग्य पालन करून करोना नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली.यावेळी मंडळाचे
अध्यक्ष श्री. विलास वर्तक आणि सेक्रेटरी  श्री.प्रदीप वर्तक, तसेच सदस्य  श्री.केसरीनाथ वर्तक, श्री.सुरेश वर्तक, श्री.पांडुरंग वर्तक, श्री.राजेंद्र वर्तक आणि इतर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी अनेक ग्रामस्थ व मान्यवर यांनी श्री चे दर्शनाचा लाभ घेतला.
कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे शासकीय नियमावली नुसार यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...