मनोर सारख्या लहान गावात चोरीचे प्रमाण वाढत आहे.ह्या साठी पालघर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस ह्यांनी पोलीस स्टेशनला दिले पत्र.
मनोर (प्रतिनिधी) पालघर मधील मनोर भागात लॉक डाऊन सुरुझाल्या पासून ह्याभागात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्यामुळे पालघर जिल्हा युवक काँग्रेस चे सरचिटणीस मोईन शेख ह्यांनी .मनोर पोलीस स्टेशन ला दिले पत्र.आपल्या पत्रात त्यांनी सांगितले की मनोर गावामध्ये दररोज चोरी होत आहेत . साहेब आम्ही एवढी विनंती अर्ज करीत आहोत कि मनोर गाव हे एवढे श्रीमंत गाव नाही तसेच लॉकडाउन चा मारा अश्या परिस्थितीत गावात दिवसेंदिवस चोरी चे प्रमाण वाढत आहेत . साहेब , ही मोठी चिंतेची बाब आहे यावर तुम्ही कडक कार्यवाही केली पाहिजे . अन्यथा .असेच चो - या होत राहील्या तर आपल्या गावाचे कसे होणार ? साहेब , आम्ही अशी अपेक्षा करतो की आपण या अर्जाचा विचार करावा व कडक कार्यवाही चोरांवर करावी . ही नम्र विनंती निवेदन देण्यात आले त्यावेळेस उपस्थित मोईन रिदवान शेख पालघर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरमान हाकीम सरचिटणिस युवा राष्ट्रवादी काॅग्रेस पाटीँ एजाज शेख समाजसेवक तौसिफ पठाण समाजसेवक श्री तौफिक घाची मनोर शहर अध्यक्ष बहुजन विकास आघाडी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment