सामान्य माणासाचा न्यायपालीकेवर आजही विश्वास कायम आहे! महाराष्ट्र व गोवा बार काँन्सीलचे अध्यक्ष गजानन चव्हाण,
अनगांव ( किशोर पाटील) न्यायपालीकेवर सामान्य माणसाचा विश्वास आजही कायम आहे.वकीलांनी आपल्या पक्षकाराची बाजू अभ्यासपने सक्षमपणे न्यायालयासमोर मांडून पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे स्पष्ट मत महाराष्ट्र व गोवा बार काँन्सीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड गजानन चव्हाण यांनी भिवडी येथे झालेल्या सन्मान सोहल्यात मार्गदर्शन करताना केले. भिंवडी वकील संघटनेच्या वतीने महाराष्ट्र व गोवा बार काँन्सीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड गजानन चव्हाण यांचा सत्कार व वकीलाच्या भ्रमणध्वनी पूस्तकीचे प्रकाशन सोहल्याचे आयोजन करण्यात आले होते. न्यायपालिकेमध्ये काम करताना वकीलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे,त्या अडचणी दूर करण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन अँड गजानन चव्हाण यांनी वकीलांना दिले, महाराष्ट्र व गोवा बार काँन्सीलचे माजी अध्यक्ष व जेष्ठ विधिज्ञ प्रमोद पाटील, भिंवडी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड मंजित राऊत,सचिव अँड जितेद्र पाटील, अँड हर्षल पाटील,अँड नाना अय्यर, अँड दिनेश्वर पाटील ,अँड कीरण चन्ने,अँड शिरीष बोरकर अँड समिर पाटील अँड अनिल वखारे अँड प्रविण शेलार, अँड सिद्धार्थ भोईर अँड शशिकांत गोतारणे अँड धनजंय चौधरी,,भिंवडी न्यायालयाचे मूख्यन्यायाधिश जे व्ही पालीवाल याच्या हस्ते चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या वेली न्यायाधिश एम एम माळी,न्यायाधिश ए एस पानसरे,न्यायाधिश एस एस काळे,न्यायाधिश एस व्ही साळवी,न्यायाधिश पी एस बिडकर,न्यायाधीश एच कावले सह अँड अभिषक भोई,अँड सूदर्शन पाटील,अँड प्रदिप मते,अँड यूवराज पाटील अँड शिवाजीराव पाटील अँड सचिन पाटील, अँड सूनील पाटील, अँड हरेष पाटील उपस्थित होते.तर सूत्रसंचालन भिवडी वकील संघटनेचे सचिव अँड जितेद्र पाटील यांनी केले.
भरे व कीरवली गावात हायमस्क उद्घाटन ------------------------------------------
- अनगांव भिंवडी तालुक्यातील दाभाड जिल्हा परिषद गटामधील भरे व कीरवली गांवात जिल्हापरिषद सदस्य दयानंद पाटील यांच्या सेस फंडाच्या निधिमधून उभारण्यात आलेल्या हायमस्क उद्घाटन भाजपाचे दशरथ पाटील,भिंवडी पंचायत समितीचे सदस्य गूरूनाथ जाधव याच्या हस्ते करण्यात आले आहे. केद्रीय पंचायत राज्यमंत्री कपील पाटील याच्या पूढाकाराने विकासकामे करण्यात येत आहेत,गणेशोत्सवामध्ये हायमस्क सूविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकामध्ये समाधान व्यक्त करीत आहेत,यावेली,जिप सदस्य दयानंद पाटील, ज्ञानेश्वर पवार,रंजना जाधव,राजू राऊत,सूभाष पाटील सह ग्रामस्थ ऊपस्थित होते,
No comments:
Post a Comment