सुप्रसिद्ध ध्वनीमुद्रक श्रीकृष्ण सावंत यांना छंद लागला बाप्पाचा......!
प्रतिनिधी - किशोर पाटील
मुंबई:- आपल्या हिंदू दैवतां मध्ये सर्वात लाडका असणारा देव म्हणजे आपला गणपती बाप्पा! प्रत्येक जण त्याला श्रद्धेने पुजतो ! मुले तर अगदी प्रेमाने लाडाने त्याला आपला मित्र बनवतात.त्याप्रमाणे श्रीकृष्ण सावंत यांना बाप्पा अगदी लहानपणापासूनच आवडायचां. सन 1991 साली नोकरीचा शोध घेत असताना त्यांना ताडदेव येथील एस एल रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये साऊंड रेकॉर्डिस्ट सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. तो स्टुडिओ प्रसिद्ध उद्योगपती श्री शशांक लालचंद व राणी वर्मा यांचा होता. त्या स्टुडीओमध्ये असंख्य गणपतीच्या मूर्ती होत्या. ते जॉब करत असताना त्यांना रोज बाप्पाची सेवा करण्याचा योग आला.आणि तेव्हा पासूनच ते बाप्पाचे परम भक्त झाले.तसेच या बाप्पाने त्यांना अनेक कामात प्रचीति दिली. सन 2000 सांली एस एल स्टुडिओ बंद झाला. तसेच आता आपणास बाप्पाच्या मुर्त्या दिसणार नाहीत. अशी मनात खंत असताना कृणाल म्युझिक कंपनीचा विधि रेकॉर्डिंग स्टुडिओ निर्माण झाला. त्याचे मालक श्री जयेश विरा हे जैन धर्माचे असताना श्रीकृष्ण सावंत यांनी त्यांना त्यांच्या छंदाविषयी माहिती दिली. त्यांनी श्रीकृष्ण सावंत यांना प्रोत्साहित केले. आणि त्यांच्या हातून अनेक मुर्त्या विधी स्टुडिओमध्ये विराजित झाल्या. तसेच ध्वनिमुद्रण करता करता अनेक नामवंत संगीतकार नामवंत गायकांची गाणी रेकॉर्डिंग करण्याचा त्यांना सौभाग्य प्राप्त झालं. ही बाप्पाची कृपाच म्हणावी लागेल.तसेच आज स्टुडिओमध्ये 350 आणि त्यांच्या राहत्या घरी 500 अशा मिळून 850 मुर्त्या विराजमान आहेत. यामधे माती ब्रास लाकडी मेटल फायबर अश्या अनेक प्रकारच्या मुर्त्या संग्रहात आहेत.तसेच त्यांना बाप्पाचे फोटो जमवण्याचाही छंद लागला. साधारण 21000 जास्त फोटो माझ्या संग्रहात आहेत. तसेच आयुष्याच्या वळणावर प्रवास करता करता अनेक संकटातून गणपती बाप्पाने त्यांना सावरले. त्याच्या नामस्मरणाने येणारा प्रत्येक दिवस त्यांना सुखावून जातो.दिवसभर बाप्पाच्या सान्निध्यात असताना कसलीच उणीव भासत नाही. बाप्पाच्या कृपेने त्यांना दैनिक, मासिक , आणि दूरदर्शनच्या बातम्या मधून प्रसिद्धी मिळाली. संगीत क्षेत्रात श्रीकृष्ण सावंत हे नाव अलौकिक आहे. त्यांनी बाप्पाची अनेक गाणी लिहिली आणि ती प्रसिद्धही झाली.तसेच लॉकडाऊन मध्ये बाप्पाने श्रीकृष्ण सावंत यांना बाप्पाने चित्रकलेचा छंद लावला.तसेच त्याच्या कृपेने त्यांनी 200 रेखाचित्र काढली. श्रीकृष्ण सावंत बाप्पाची सेवा करता करता समाजसेवेत ही सहभागी झाले आहेत.श्रीकृष्ण सावंत राहत्या सोसायटी मध्ये अध्यक्ष पदावर कार्यरत आहे.अशा या बाप्पा विषयी किती बोलू.माझा लाडका देव आजही माझ्यावर त्याचा वरदहस्त आहे आणि तो पुढे असाच राहील.असे श्रीकृष्ण सावंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment