Monday, September 13, 2021

एक गाव एक गणपती उत्सवाची ५० वर्षे,केळवे-भरणेपाडा येथील श्रीगणेशा चे आमदार श्रीनिवास वनगा यांनी घेतले दर्शन

*एक गाव एक गणपती उत्सवाची ५० वर्षे,*
*केळवे-भरणेपाडा येथील श्रीगणेशा चे आमदार श्रीनिवास वनगा यांनी घेतले दर्शन*
पालघर (प्रतिनिधी)
पालघर तालुक्यातील केळवे येथील भरणेपाडा येथील श्रीगणेश उत्सव मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील श्रीगणेश उत्सव मंडळाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून विशेष म्हणजे एक गाव एक गणपती  असा उत्सव साजरा केला जातो.
या वर्षी मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोविड नियमांचे पालन करून रक्तदान शिबिर,सासुरवाशीण -माहेरवाशीण मेळावा,नेत्र तपासणी शिबिर, आणि सत्यनारायण महापूजा च आयोजन केले होते. 
पालघर विधानसभेचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी या मंडळास भेट देऊन श्रीगणेशा चे मनोभावे पूजा केली.व दर्शन घेतले.
दरम्यान मंडळाच्या व ग्रामस्थाच्या एक गाव एक गणपती या अभिनव उपक्रम राबवले याबाबद्दल आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी कौतुक केले. यावेळी आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना ते म्हणाले की, एक गाव एक गणपती अश्या अभिनव उपक्रमामूळे गावात एकी निर्माण होऊन विकासाला चालना मिळते तसेच गेली दोन वर्षे कोविड या महामारीने जगाला ग्रासले आहे. या महामारीतून बाप्पा लवकर सर्वांना बाहेर काढतील असा आशावाद व्यक्त करून आपण पूर्वी सारखेच सर्व उत्सव लवकरच साजरे करू,तूर्तास  सर्वांनी कोविड काळ लक्षात घेऊन काळजी घ्यावी.असे आवाहन ही केलं. 
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक किणी, उपाध्यक्ष श्री.गजानन किणी,श्री.मंगेश किणी,सचिव श्री. दिलीप घरत तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...