वसई पुर्व येथे, करोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराला मा. मान्यवरांची उपस्थिती
वसई ( हिरालाल लोखंडे )
सणासुदीचे दिवस जवळ येत असताना, जन सामान्य नागरिक हे एक मेकांना हार्दिक शुभेच्छा, देव दर्शन आदिसाठी एकत्र येत असतात. वा वेळी करोनाचा प्रसार व त्यापासून बचावासाठी दिनांक १५ सप्टेंबर २०२१रोजी वसई इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या माध्यमातून, वसई पुर्व ता. वसई जिल्हा पालघर येथे मोफत करोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर राबविण्यात आलेले. सामान्य जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी, या असोसिएशनच्या वतीने सुमारे ५,०००. ( अक्षरी पांच हजार ) करोना प्रतिबंधक लसीचा साठा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सदर लसीकरण शिबिराला मा. श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा श्री. नारायण मानकर माजी महापौर वसई विरार महानगरपालिका, श्री काशिनाथ पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली असून या वेळी मान्यवरांनी, सर्वसामान्यांना दाखवून दिले, आपण एकटे नाहीत, आपणा सर्वांना या करोनारुपी महामारी विरूध्द लढायचे आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत. वसई इंडस्ट्रीयल असोसिएशनचे पदाधिकारी श्री राकेश निकम, दिनेश पवार, मनोज भाडवलकर, मनोज राय, विनायक नाईक, गणेश पाटकर, रिझवान शेख, निझोन ईतवारी आदी यांचे करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात मोलाचे सहकार्य आहे.
No comments:
Post a Comment