Wednesday, September 15, 2021

मा.जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधिकक यांना रिपाइं (आ)तर्फे दिले निवेदन .

मा.जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधिकक  यांना रिपाइं  (आ)तर्फे दिले निवेदन .  

पालघर (प्रतिनिधी)१४/०९/२०२१ रोजी मा.जिल्हाधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक यांना वरील निवेदन देण्यात आले पुरोगागी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसंपासून बलात्काराचे प्रमाण वाढले असून २-३ दिवसापूर्वी साकी नाका अंधेरी येथील एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणातील महिला राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना तिची प्राणज्योत मावळली या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे अश्या किती निर्भया बळी पडणार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे मुख्यमंत्री साहेबांनी यात लक्ष घालून दोषींना कठोरात-कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा व्हावी अशी रिपाई (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले सदर प्रकरणाचा  रिपाई (आ) पालघर जिल्हा जाहीर निषेध करते तसेच अलीकडे पक्षात काम करीत असताना काही अधिकारी कंपनीचे मालक यांना हाताशी धरून कार्यकर्त्यांवर आंदोलन करीत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत महाराष्ट्र शासनाचा GR असा आहे की, ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी असे खटले दाखल झाले आहेत ते सर्व खारीज करण्यात यावे यामुळे गरीब कामगार सामाजिक आंदोलन करणारे पालघर जिल्हयातील विविध पक्षातील पदाधिकारी असतील त्यांच्यावरील दाखल केलेले खोटे गुन्हे खारीज करण्याबाबतचे निवेदन मा.मुख्यमंत्री साहेब, मा.गृहमंत्री साहेब, मा. पोलिस महसंचालक, मा. जिल्हाधिकारी, मा.पोलिस अधीक्षक, मा.पोलिस विभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन देताना रिपाई (आ) चे जिल्हाध्यक्ष  आयु.सुरेश जाधव, उपाध्यक्ष कुंदन मोरे, कार्याध्यक्ष रामराव तायडे, तालुका युवा अध्यक्ष शरद जाधव, शहर उपाध्यक्ष राम ठाकूर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...