दिव्यांगासाठी मोफत लसीकरण उपक्रम
मा. श्री, राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) वंदेमातरम अंध अपंग सेवाभावी संस्था सफाळे ता,जि पालघर. यांच्या माध्यमातून मा. श्री, राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा यांच्या मार्गदर्शन व सौजन्याने व ग्रामपंचायत सफाळे उंबरपाडा यांच्या सहकार्याने दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी देवभुमी हाॅल सफाळे बाजार पेठ सफाळे पूर्व ता,जि पालघर. येथे दिव्यांगाना मोफत, करोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा संयुक्त रित्या उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री मिलींद चव्हाण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर , श्री मिलींद रणदिवे प्राथमिक आरोग्य प्रभारी अधिकारी सफाळे श्री राजेश म्हात्रे ( बंटी ) सामाजिक कार्यकर्ते श्री विनोद राऊत वंदेमातरम अंध अपंग संस्था अध्यक्ष यांच्या हस्ते व मान्यवर श्री पी टी पाटील सर, श्री अमोद जाधव माजी सरपंच सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायत, याच्या उपस्थितीत व बहुजन विकास आघाडी पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समक्ष संपन्न होऊन, श्री शिवाजी पवार आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांची सहकारी गृप यांच्या यांच्या सहकार्याने शेकडो दिव्यांगानाचे लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रम संपन्न करण्यात अंध अपंग संस्थेचे पदाधिकारी तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग असून. कार्यक्रमा बद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच आयोजकांचे आभार मानीत आहे.
No comments:
Post a Comment