*परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू*
पालघर(प्रतिनिधी) दि.०३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2020, शनिवार, दि 04 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येत असून सदरची परीक्षा पालघर तालुक्यातील एकूण 06 उपकेंद्रावर घेणार आहेत व सदरच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2020, या परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षा केंद्राचे परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, झेरॉक्स सेंटर, सायबर कैफे, फैक्स केंद्र, ध्वनीक्षेपक व तत्सम दूरसंचाराची साधने या ठिकाणाहून गैरव्यवहार होवू नये म्हणून तसेच बकायदेशिर जमाव जमून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अगर शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अपप्रक्रियांना प्रतिबंध घालणे जरुरीचे आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी पालघर डॉ. किरण महाजन मला फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (2)(3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पालघर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2020 1) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर (महाविर भवन) 2) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर (लॉ इमारत) 3) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर (BMS+तरे भवन) 4) व्टिंकल स्टार इंग्लिश स्कूल, पालघर 5) यशवंत चाफेकर महाविद्यालय पालघर 6) जिवन विकास (स.तु. कदम हायस्कूल, पालघर या परिक्षा केंद्रावर परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षाविषयक कामकाज पाहणेकरिता नेमलेले अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अंध व अपंग परिक्षार्थी यांच्या बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज बेकायदेशिर जमावास परिक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात शनिवार दिनांक 04 सप्टेंबर 2021 रोजी 00.01 ते 24.00 या कालावधीकरीता प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment