महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर यांच्या कडून कोकण वासियांना मद्दतीचा हात
पालघर (प्रतिनिधी)कोकण परिसरातील भीषण महापुराने हजारो कुटुंबे उद्वस्त झाली आहेत. वीज नाही, पाणी नाही, खायला अन्नही नाही आणि वरुन पडणारा पाऊस कोकण वासियांच्या धैर्याचा, जिद्दीचा आणि संयमशीलतेचा कसोटी पाहत आहे की काय अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शक्य ती मदत करा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी केले होते.
त्यामुळे जे पुरातून सुरक्षितपणे बाहेर आले आहेत, त्यांना जीवनावश्यक वस्तुंची गरज भासत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्त बांधवांना गहू, तांदूळ, डाळी, तेल, , पिण्याचे पाणी बॉटल, लहान मुलांचे कपडे, घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू अशा जीवनावश्यक वस्तूंचे पालघर मनसे तर्फे वाटप करण्यात आले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर शहरातून उपशहर अध्यक्ष निशांत धोत्रे, विभाग अध्यक्ष नयन पाटील, नदीम शेख, प्रणय संखे, वाहतूक सेना शहर संघटक सौरभ संखे, विद्यार्थी सेना शाखाध्यक्ष साईश नारगोळकर यांच्यातर्फे कोकणवासीयांसाठीची मदत बोईसर मनसे मदत कक्षामध्ये उपतालुकाध्यक्ष श्री. चेतन संखे साहेबांकडे सुपूर्द केली.
No comments:
Post a Comment