Tuesday, August 3, 2021

प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे यांना शेड व्दारा,आॅक्सिजन सिलेंडर भेट !

प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे यांना शेड व्दारा,आॅक्सिजन सिलेंडर भेट !
Ààpaa 

सफाळे ( हिरालाल लोखंडे ) मानव आणी परिसर विकास संस्था ( शेड ) कालीनी मुंबई - २९ , संस्थापक अध्यक्षा बेगम बिल्किस लतीफ. यांच्या व्दारा मुंबई आणी महाराष्टात अनेक ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रम करण्यात येत असतात. विराथन बुद्रुक सफाळे पश्चिम ता,जि पालघर येथे त्यांचे ग्रामीण कार्यालय असून त्या मार्फत गरजू गरजवंत विध्यार्थी यांना शैक्षणिक व  साहित्य मदत, गरजवंत महिलांना सबलीकरण करण्यासाठी, विषेश कार्यक्रम राबवून, त्यांना रोजगार उपल्ब्ध करून दिला जात आहे. 
       करोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे राज्यात आॅक्सिजन सिलिंडर च्या तुटवड्यामुळे अनेक रूग्णांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली. या घटनेचा विचार करत दिनांक ३ आॅगस्ट २०२१ रोजी मानव आणी परिसर विकास समिती - ( ग्रामीण ) विराथन बुद्रुक सफाळे पश्चिम ता,जि पालघर. यांच्या सौजन्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे ता,जि पालघर. यांना १० ( दहा ) आॅक्सिजन सिलेंडर व त्यांना आवश्यक लागणारे साहित्य 
, या संस्थेचे श्री राजेंद्र तावडे मुख्य कार्यकारी अधिकारी ( C E O ) यांनी उपल्ब्ध करून प्रा. आरोग्य केंद्र सफाळे यांना भेट म्हणून दिली. याकामी या संस्थेच्या निता म्हात्रे व तृप्ती पाटील यांनी मोलाची कामगिरी केली आहे. 
    प्राथमिक आरोग्य केंद्र  सफाळे  येथील डॉक्टर श्री मिलींद रणदिवे  भेटवस्तू स्विकारीत असताना  श्री  राजेश म्हात्रे ( बंटी ) सामाजिक कार्यकर्ते  व उपसरपंच ग्रामपंचायत सफाळे. निता म्हात्रे, तृप्ती पाटील, आरोग्य सेविका, आशा , प्रा. आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. भेट देणार्‍याचे आभार मानण्यात आले

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...