Sunday, August 15, 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने ७५ व्या अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ, मास्क, सँनिटाइजरचे वाटप!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने  ७५ व्या अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ, मास्क, सँनिटाइजरचे वाटप!


ठाणे दि.१५(किशोर पाटील)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री.वसंत मुंढे, राज्य संघटक श्री.संजयजी भोकरे, मुबंई विभाग प्रमुख श्री. रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. राकेश टोळ्ये, राज्य सरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे, प्रसिध्दी प्रमुख श्री.नवनाथ जाधव  कोकण विभागीय अध्यक्ष श्री.नितीनजी शिंदे,कोकण विभागीय सचिव श्री. किशोरजी पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली  कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी कोकण विभाग व ठाणे जिल्हा कार्यकारणी तसेच सर्व  सदस्यांनी भारतमाता, राष्ट्रपिता महात्मा गांधी , महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली.  त्यानंतर  ठाण्यातील तीनहात नाका येेथील सिग्नल वर,माजिवडा नाक्यावर शाळेतील मुलांना, व रेल्वे स्टेशन फुटपाथवरील गरजु व गरीब मुलांना खाऊ आणि आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष नितिन मनोहर शिंदे, ठाणे शहर सचिव मिलींद दाभोळकर, संर्पक प्रमुख सतिशकुमार भावे, कार्याध्यक्ष अतुल तिवारी, सह सचिव ज्योती चिंदरकर, सह सचिव प्रमोद घोलप, सहसंपर्क प्रमुख मनिष वाघ, संघटक मनोज कदम, कल्याण संघटक मिनल मोरे,प्रसिध्दीप्रमुख सुबोध कांबळे, देवेंद्र शिंदे, अमित गुजर, सदस्य राहुल आहिरे, सचिन शिंगे, अमित जाधव, न्युज मराठी बाणा आणि सा. तरुण आव्हान  प्रतिनिधी मनीष तळदेवकर, मनस्वी चौधरी, पल्लवी होनखंडे, वंशिका चाचे मनाली मोरे, समाधान अवताडे, संजोग अधिकारी उपस्थित होते.
भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व पट ऊन देऊन किती देशभक्त,क्रांतिकारक यांनी देशासाठी बलिदान दिले याबद्दलची माहिती कोकण विभागीय अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोणकोणते उपक्रम राबवते याबद्दल माहिती दिली.तसेच सदर उपक्रम हे 
पत्रकार संघाच्या वतीने अनेक ठिकाणी राबविण्यात येतील असे ही शेवटी त्यांनी सांगितले....

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...