बोईसर:(प्रतिनिधी) इराकची राजधानी बगदादपासून१०० की. मी. उत्तर पूर्व दिशेला कर्बला हे एक छोटेसे गांव आहे. यथे इस्लामिक चळवळीचे ऐतिहासिक युद्ध झाले ज्याने इस्लाम धर्माच्या चेहरा मोहराच बदलून टाकला.हिजरी सवंतच्या(ईस्लामिक वर्ष) पहीला महीना म्हणजे मोहर्रम . मोहर्रमच्या १० तारखेला ( १० मोहर्रम ६१ हिजरी अर्थात इ. स.६८० मध्ये ) मोहम्मद पैगंबर साहेब (स.अ.) यांचे नातू हजरत हुसैन यांना कर्बला येथे यजीद यांचा साथीदारांनी युद्ध भूमीवर सायंकाळी असर ची नमाज अदा करत असताना जेव्हा हजरत हुसैन हे सजदा मधे गेले ( माथा टेकून नमाज मध्ये झूकणे ) तेव्हा यजीदच्या सैन्यांनी हीच संधी साधून हजरत हूसैन यांच्या गळ्यावर धोक्याने वार केले यात हजरत हूसैन शहीद झाले. तो दिवस म्हणजे यौमे आशूरा होय. याच दिवशी हजरत हुसैन यांचा वीर मरनाच्या स्मृतिमध्ये मुस्लिम बांधव मोहर्रम साजरा करतात. सत्यासाठी आपले व आपल्या कूटूंबियाचे बलिदान देणाय्रा ईस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर साहेब (स.अ.)यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांचा आठवणी साठी पूर्ण देशात ठिकठिकाणी धार्मिक प्रवचन होते .इतिहास कायम स्मरणात राहावा यासाठी मोहर्रम निमित्ताने मोहर्रमच्या १० दिवस तारापुर गावातील रफाई मोहल्ला झेंडा चौक ,गवंडी मोहल्ला ,तेलीवाड़ा ,ताज्या मोहल्ला, हुसैनी टेकडी, कादरी मोहल्ला, येथे मजलिसच्या कार्यक्रम तर पटणी मोहल्यात हजरत इमाम हुसैन यांची आठवण म्हणून प्रवचनाच्या कार्यक्रम होतो. मोहर्रम सणां निमित्ताने तारापूर मोहल्ल्यात मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी मूस्लीम जमातचे अध्यक्ष वसिम पूनावाला,ताजूद्दीन मूल्ला,नासरुद्दीन सोपारकर,मिस्बा गवंडी,अब्दूल्ला सोपारकर, राजू पटनी,नासिर कौलारिकर,मूफीद गवंडी,नौशाद सैनिल्ला, बल्लू दमणवाला,मूश्ताक पटणी,सुलेमान शेख,शहेबाज शेख, रफिक शेख , शकील गवंडी,नासिर शेख गोरेगांव,सह मान्यवर उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...
No comments:
Post a Comment