Friday, August 20, 2021

बहुजन विकास आघाडी पक्षात बोईसर मधील तरुणांनाचा प्रवेश.

बहुजन विकास आघाडी पक्षात बोईसर मधील तरुणांनाचा प्रवेश.


प्रतिनिधी - विरार वसई शहरातील  होत असलेला विकास बघता, बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे नेतृत्व, कार्यसम्राट मा. श्री हितेंद्र ठाकुर ( आप्पा )आमदार साहेब याची कार्यकरण्याची क्षमता तसेच कार्यक्रर्ते यांच्या मदती साठी वेळोवेळी मदतीसाठी हजर राहणारे, राजकारण कमी समाज सेवेसाठी तत्पर राहणारे म्हणून जनमानसाच्या मनावर राज्य करणारे, म्हणून मान्य असलेले आमदार यांच्या सानिध्यात येण्याची संधी शोधणारे अनेक तरूण त्यांचे चाहते आहेत. 
  दिनांक २२ आॅगस्ट २०२१ रोजी  बोईसर येथील विविध भागातील अनेक तरुणांनी श्री विश्वनाथ घरत बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष यांच्या सहकार्याने व मा. श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा यांच्या कार्यशैलीमुळे भारावलेले तरूण. मोहन सिनलकर, सूरज दुबे, शुभम सिंग, विश्वजीत राऊत, शिवकुमार गुप्ता, रवी सहानी, मोहित भाडाणा, अभिषेक झा,  रमेश चव्हाण, अमजद अन्सारी आदी तरूणांनी बहुजन विकास आघाडी  या मध्ये प्रवेश केला. 
    या प्रसंगी भावना विचारे पंचायत समिती सदस्य, अनिल रावते पंचायत समिती सदस्य, श्री अविनाश चुरी जेष्ठ नेते, युवा कार्यकर्ते रूपेश पाटील, धनश्री रेवंडकर युवा महिला अध्यक्षा, संजय बारी, अजय शेरे, सुधीर माने आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...