*जि.प. अध्यक्षांनी केली १७ गावे पाणी पुरवठा योजनेची पाहणी
पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी काल दि. ५ ऑगस्ट रोजी झान्झरोळी येथील धरणावरील पालघर तालुक्यातील केळवे माहीम १७ गावे नळ पाणी पाणीपुरवठा योजनांची पाहणी केला. माहीम ग्राम पंचायत मधील काही भागात नळाद्वारे गढूळ पाणी आले. त्यानिमित्ताने अध्यक्ष यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन सर्व गावाना जलजीवन मिशन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा लवकरात लवकर व्हावा याकरिता उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी सभापती महिला व बालकल्याण नमिता राऊत,जि.प.सदस्य सीमा रावते, करिश्मा उमतोल, डॉ.वैशाली करबट ग्रामस्थ रामदास पाटील कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा जी.पी. निवडुंगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपअभियंता नरेश पाटील आणि इतर अधिकारी पाहणीच्या वेळी उपस्थित होते. सदर योजना नाविन्यपूर्ण करण्याची कार्यवाही सुरु असून पावसामुळे गढूळ पाणी येते हि वस्तुस्थिती आहे. परंतु प्रस्तावित योजने मध्य जल शुद्धीकरण केंद्र असून यापुढे गढुळ पाणी येणार नाही अशी माहिती उपस्थित अधिका-यांनी अध्यक्ष वैदेही वाढाण यांना दिली.
यावेळी रस्ते दुरुस्ती विषयी ग्रामस्थांनी अध्यक्ष वैदेही वाढाण यांना निवेदन दिले. तसेच सफाळे कान्द्रेभोरे येथील शाळेस व बंदाटे येतील उपकेंद्रास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.
No comments:
Post a Comment