Monday, August 16, 2021

भिवंडी प्रांत अधिकारी म्हणून बाळासाहेब वाघचौरे यांनी पदभार स्वीकारला

भिवंडी प्रांत अधिकारी म्हणून बाळासाहेब वाघचौरे यांनी पदभार स्वीकारला


भिवंडी दि.१६ (किशोर पाटील ) भिवंडी उपविभागीय अधिकारी म्हणून बाळासाहेब वाघचौरे यांनी पदभार स्वीकारला आहे.डॉ.मोहन नळदकर यांचा भिवंडी येथील प्रांत म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राज्य शासनाने डॉ.नळदकर यांची मुंबई महसूल विभागात बदली केली आहे.शासकीय नियमानुसार डॉ.मोहन नळदकर व भिवंडी चे तहसीलदार श्री.अधिक पाटील यांनी नवनियुक्त प्रांत अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांचे भिवंडी प्रांत कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व  त्यांच्याकडे प्रशासकीय कार्यभार सोपवला आहे.नवनियुक्त भिवंडी उपविभागीय अधिकारी (प्रांत) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते. ते कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन )म्हणून परिचित आहेत.नवनियुक्त उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी प्रांत अधिकऱ्याचा पदभार स्वीकारताच भिवंडी व शहापूर तालुक्यातील आदिवासिंचे प्रश्न व  सर्व सार्वजनिक महसूली नागरी समस्या सोडवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...