केळवा शितलादेवी मंगलधाम येथे रक्तदान शिबिर संपन्न,
" सौजन्य "
पालघर जिल्हा पोलीस दल / केळवा सागरी पोलीस ठाणे / रोटरी क्लब पालघर
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) कोविड १९ सारख्या महामारीच्या काळात, सरकार आपले कर्तव्य बजावत असताना, सरकारी यंत्रणाही आपापल्या परीने करोना १९ या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. वेळोवेळी जनजागृती करत, या रोगाविरूध्द लढण्यासाठी आपले सहकार्य हे मोलाचे आहे. हे समजून सांगत असताना जनता सुध्दा, त्या नियमांचे स्वयंफुर्तीने ,त्या नियमावलीचे पालन करीत आहे. सर्वत्र प्रयत्न सुरू असतांनाहि. अनेक ठिकाणी रक्त पुरवठ्याची कमतरता ( तुटवडा ) भासत आहे. या प्रसंगी सामाजिक संस्था, यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तर कधी, पालघर जिल्हा पोलीस दल, केळवा सागरी पोलीस ठाणे, रोटरी क्लब पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने.दिनांक १५ आॅगस्ट २०२१ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करून संपन्न केले.
मा. श्री दत्तात्रेय शिंदे पोलीस अधिक्षक पालघर, यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस ठाणे व रोटरी क्लब पालघर यांच्या संयुक्त रित्या १५ आॅगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत, शितलादेवी मंगलधाम केळवा ता,जि पालघर. या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले. श्री दिपेश ठाकुर प्रेसिडेंट रोटरी क्लब पालघर, श्री अरूण पाटील सेक्रेटरी रोटरी क्लब पालघर, डॉक्टर अश्विनी पाटील, सलिल करंजीकर, श्री भुषण सावे प्रोजेक्ट चेअरमन, श्री भीमसेन गायकवाड सहा, पोलीस निरीक्षक - प्रभारी पोलीस अधिकारी सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर.यांनी केळवा सागरी पोलीस ठाणे विभागातील, नागरिकांमध्ये जनजागृती करून, नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून / पटवून त्या दिवशी रक्तदान करण्याचे महत्त्व पटवून सांगितले. रक्तदान करण्याचे आवाहन केले. परिसरातील तरूण वर्ग, महिला यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत, ५०० ते ६०० नागरिकांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली. केळवा सागरी पोलिस ठाणे येथील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, परिसरातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, उपसरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, विभागातील क्रिकेट प्रेमी संघ, व त्यांची पुर्ण टिम, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ३५८ रक्तदात्यानी रक्तदान केले.
रोटरी क्लब पालघर / केळवे सागरी पोलीस ठाणे व्दारा क्रिकेटपटू रक्तदाते यांना क्रिकेट बॅट, स्टंप, सोबत ३ बाॅल, सह इतर रक्तदाते प्रमाणे मास्क, सॅनिटायझर, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. मा. श्री दत्तात्रेय शिंदे पोलीस अधिक्षक साहेब पालघर यांनी केळवे सागरी पोलीस ठाणे अधिकारी, कर्मचारी, रोटरी क्लब पालघर यांनी संयुक्त रित्या जनजागृती करीत, नियोजन यशस्वीपणे करीत, भव्यदिव्य रक्तदान संकलन कार्यक्रम केल्या बद्दल कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment