गावठी दारू धारकांवर, केळवा सागरी पो. ठाणे व्दारा कारवाई !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १०आॅगस्ट २०२१रोजी सागरी पोलिस ठाणे येथील प्रभारी अधिकारी आणी कर्मचारी आपल्या पोलीस ठाण्यातील हद्दीतील गावात बंदोबस्त व गस्तीवर असताना मौजे वेळंगी पोस्ट आगरवाडी ता,जि पालघर येथे, स्वतःच्या फायद्यासाठी. कोणत्याही प्रकारचा दारू विक्री, जवळ बाळगणे बद्दल अधिकृत परवानगी नसताना. प्रमोदिनी प्रमोद भोईर वय वर्ष ५२ राहणार. वेळंगी.पोस्ट आगरवाडी ता,जि पालघर. यांच्या राहत्या ठिकाणी, हातभट्टीची गावठी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण ( वाश ) अंदाजे ८०० लिटर मिळून आले असून सोबत देशी - विदेशी दारू ,असा अंदाजे २७,८८२ रूपये किंमती चा मुद्देमाल आरोपीच्या कब्जात मिळून आला असल्याने, केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे आरोपी प्रमोदिनी प्रमोद भोईर यांच्या विरोधात गुन्हा रजि,नंबर ४२ / २०२१ भारतीय दारू बंदी अधिनियम ६५ ( फ ) ( ई ) कलम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर घटना ठिकाणी प्रभारी पोलीस अधिकारी केळवा सागरी पोलीस स्टेशन श्री भिमराव गायकवाड साहेब सा,पो,निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी श्री सोमनाथ धनवट पो, शिपाई, श्री जयदीप सांबरे पो, शिपाई श्री संदीप खिल्लारे पो, शिपाई. निर्मला राजू वर्पे महिला पो, शिपाई श्री प्रवीण भोईर - पोलीस पाटील माकुणसर यांनी कारवाई केली असून तपासी अंमलदार एस एस गोवारी महिला पो, नाईक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment