Friday, July 9, 2021

सागरी मासेमारी करणाऱ्या**नौका मालकांना विनम्र आवाहन

*सागरी मासेमारी करणाऱ्या*
*नौका मालकांना विनम्र आवाहन*

पालघर (प्रतिनिधी)दि. 09 : सर्व सागरी मासेमारी करणाऱ्या नौका मालक मच्छिमार बंधू-भगिनींना जाहीर आवाहन करण्यात येते की, गेले निसर्ग चक्रीवादळ व या वर्षी तोक्ते चक्रीवादळ यांचा फार वाईट अनुभव आपल्याला दिसून आलेला आहे. या दोनही वर्षी समुद्रामध्ये कार्यरत असलेल्या नौकांचे वादळी वारे व सांगरी लाटांच्या माऱ्यामुळे अतोनात नुकसान झालेले दिसून आले आहे. सद्यस्थितीत अशा नुकसानग्रस्त नौकांकरिता देण्यात येणारी मदत अत्यंत तुटपुंजी स्वरुपाची आहे.
याबाबत अधिक विचारमंथन केल्यानंतर असे दिसून येते की, मच्छिमार नौकाचा आपत्ती जोखमीचा विमा अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचा असतो. यामुळे अर्थातच वादळामुळे या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नौकेची हानी झाल्यास फार तुटपुंज्या स्वरुपाचे विमाछत्र असल्यामुळे नुकसान भरपाई तेवढी मिळत नाही. अर्थातच यामुळे नौका मालकाचे फार मोठे नुकासान होते.
दुसरी गोष्ट अशी की या नौकावर कार्यरत असलेले खलाशी ते काही आपल्या गावातील असू शकतील व अन्यत्र ठिकाणाहून ते मजुरीसाठी आपल्या नौकांवर कार्यरत असतील हे सर्व खलाशी सामान्यतः अतिशय गरीब कुटूंबातील असल्याचे निदर्शनास येते. ज्यावेळी नौका मासेमारीसाठी समुद्रामध्ये कार्यरत असते त्यावेळी देखील हेच खलाशी नौकेवरच राहतात. तेथेच त्यांना निवारा व आसरा असतो. नौका जरी बंदरावर आली, तरी हे सर्व खलाशी नौकेवरच राहत असतात. बंदरावर त्यांना आवश्यक तेवढा आसरा / सुविधा निश्चितच उपलब्ध नाही.
या सर्व नौकावर कार्यरत असणारा खलाशी वर्ग यांचे विमाछत्र देखील तुटपुंजे असल्याचे दिसून आलेले आहे. या सर्व खलाशी वर्गाचा जर विचार केला तर असे दिसून येते की एका खलाश्याच्या पाठीमागे त्याचे सर्व कुटूंब उदरनिर्वाहाकरिता त्या एका खलाश्यावर अवलंबून असते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी एकाद्या मासेमारी नौकेला अपघात झाला, त्यात एखादा खलाशी बेपत्ता झाला वा मृत्युमुखी पडला तर त्याच्या कुटूंबावर आभाळ कोसळते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
यास्तव सर्व नौका मालकांना असे कळकळीचे आवाहन करण्यात येते की, आपल्या नौकेचा पूर्ण जोखमीचा विमा व त्यावर कार्यरत असणाऱ्या प्रत्येक खलाशांचा किमान रुपये पाच लक्ष एवढ्या किंमतीचे विमाछत्र खरोखरच आवश्यक झालेले आहे. शासनाकडून जी मदत देता येईल ती निश्चितच त्याच्या वारसांना देण्यात येते. त्याशिवाय नौकामालकाची देखील तेवढीच जबाबदारी आहे की जो खलाशी आपल्या नौका मालकाला व त्यांच्या कुटुंबीयांना सुखात समाधानात ठेवण्यास कार्यतत्पर असतो. तेवढीच नौका मालकाची देखील नैतिक जबाबदारी आहे की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वा बेपत्ता झालेल्या खलाशाच्या कुटूंबाला चांगली मदत करता येऊ शकेल. असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...