*जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे कुपोषणात घट*
पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात' अशा आशयाखाली वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने वृत्तपत्रातील आकडेवारी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात कुपोषणात घट झाल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. बातमी मध्ये माहे एप्रिल व मे या दोन महिन्यान मधील SAM व MAM बालकांची आकडेवारी एकत्रित करून दाखवल्यामुळे अतितीव्र कुपोषित (SAM) व तीव्र कुपोषित (MAM) बालकांची संख्या अधिक दिसून येत आहे.प्रत्यक्षात दर महिन्याच्या १ ते १० तारखे पर्यंत बालकांची वजन व उंची घेण्यात येऊन प्रत्येक महिन्याला SAM व MAM बालकांचे श्रेणीकरण करण्यात येत असून वर्तमान पत्रामध्ये SAM बालके २९५ असून MAM बालके ३२८८ अशी प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात एप्रिल २०२१ मध्ये SAM बालकांची संख्या १४६ तर MAM बालकांची संख्या १६०९ असून मे २०२१ मध्ये SAM बालकांची संख्या १४९ तर MAM बालकांची संख्या १६७९ अशी आहे. माहे मे २०२० मध्ये सॅम बालकांची संख्या २२६ तर मॅम बालकांची संख्या २२१८ अशी होती त्या तुलनेत *माहे मे २०२० पासून ३४% SAM व २४% MAM बालकांच्या संखेत घट झाली आहे.*
सन २०२०-२१ मध्ये २९६ तर मे २१ अखेर सन २०२१-२२ या काळात माहे एप्रिल व मे मध्ये ४० बालमृत्यू झाले आहेत.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा १ व टप्पा २, पूरक पोषण आहार ,दत्तक पालक योजना, 'सॅम-मॅम मुक्त अंगणवाडी अभियान', वीट भट्टी वरील स्थलांतरित लाभार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, ग्राम बालविकास केंद्र, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, गृहभेटी, कुटुंब नियोजन कार्यक्रम, नियमित लसीकरण, बालकांची व आजारी मुलांची नियमित तपासणी, मातृत्व अनुदान योजना, मानव विकास योजना, प्रधानमंत्री मातृवंदना
इ. अनेक उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे कोव्हीड १९ कालावधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांचे मार्फत सॅम व मॅम तसेच कमी वजनाच्या बालकांच्या पालकांना दररोज दूरध्वनीद्वारे सम्पर्क साधला जात असून मागील ३ महिन्यांमध्ये १४,०००वेळा पालकांशी सम्पर्क साधून समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषण ,मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास व आरोग्य विभागातर्फे अनेक उपक्रम राबवले जात असून कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कुपोषण निर्मूलन अंतर्गत टास्क फोर्स समिती व गाभा समितीच्या सभांचे नियमित आयोजन केले जाते. जिल्ह्यात काम करत असलेल्या NGO/CSR यांचे सोबत विविध विभागाचा समन्वय साधून समग्र विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशी महिती महिला व बाल विकास अधिकारी प्रवीण भावसार यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment