Monday, July 5, 2021

जल स्वराज्य समिती मौजे रोठे समस्या बाबत चर्चा संपन्न

जल स्वराज्य समिती मौजे रोठे 
समस्या बाबत चर्चा संपन्न 

सफाळे ( हिरालाल लोखंडे ) जल स्वराज्य समिती मौजे रोठे ता,जि पालघर यांची दिनांक ४ जुलै २०२१ रोजी समितीचे अध्यक्ष / माजी पं. स. सदस्य श्री योगेश पाटील यांच्या समवेत ,पाणी पुरवठा समस्या, जल स्वराज्य योजनेतून सोलर पंम्प बसविण्याचे ठरवले असले तरी संपूर्ण माहिती घेऊनच सदर योजना राबविण्यात येईल. जल स्वराज्य योजनेत जातीने लक्ष देऊन, यशस्वीपणे कशी राबवली जाईल या करीता अध्यक्ष, सचिव, समिती सदस्य प्रयत्न शिल असतील. सार्वजनिक शेत्रातील कोणतेही काम करीत असताना, ग्रामस्थांशी चर्चा करून व त्यांच्या सहकार्याने कामे करण्यात येतील. 
  मौजे रोठे हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्र एडवण ऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्र माहीमला जोडण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील. १५ % मागासवर्गीय निधीतून कोणती कामे करावयाची यावर चर्चा करून, विधवा महिला योजना, कृषी खात्याच्या योजना, आदिवासी विकास योजना यांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी व विधायक कामे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या वेळी सचिव प्रकाश सावर, सदस्य नागदेव पवार, हर्षल गावड, विनिता उराडे, माजी सरपंच गिता भोईर, चेतन इनामदार, रमेश भोईर, देवी पवार आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी चर्चेत ग्रामस्थानिही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश सावर यांच्या कडून माळत आहे .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...