Wednesday, July 14, 2021

अनेक महिने पासून फरारी असलेल्या आरोपास अटकन्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

अनेक महिने पासून फरारी असलेल्या आरोपास अटक

न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी 

सफाळे  ( हिरालाल लोखंडे ) केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर. येथे दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी शितला देवी - आदर्श विद्यामंदिर शाळेजवळ मतदान चालू असताना, आरोपी उमेश संजय भोईर उर्फ मोरगा वय वर्षे २४. व्यवसाय मजुरी, राहणार सुभाष पाडा, केळवा ता,जि पालघर. व फिर्यादी महिला यांचे भांडण झालेले. आरोपी यांने तो राग मनात धरून फिर्यादी महिला आपल्या पती सोबत, शितलादेवी मंदिरा समोरील रिक्षा स्टँडवर उभी असताना, आरोपी यांने हातात कोयता घेऊन फिर्यादी महिलेच्या मानेच्या मागिल बाजूस वार केला असता, फिर्यादी महिला खाली पडल्यावर, आरोपीने पुन्हा हातातील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने, कोयत्याने वार केला असताना, फिर्यादिने जिव वाचविण्यासाठी प्रयत्न केला असताना, तो वार फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडाच्या वरच्या बाजूस लागुन,जबर दुखापत झाल्याने, आरोपी कोयत्या सह तेथून पळ काढलेला. त्या वेळे पासून आरोपी फरार होता. 
आरोपी उमेश भोईर उर्फ मोरगा यांच्या वर सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि, नंबर ०१ /२०२० भा.द.वि.कलम ३०७,५०४,५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्या वेळेपासून आरोपी फरार होता. आरोपी मोबाईल फोनचा सुध्दा वापर करीत नव्हता. आरोपी दिवसा विरार, वसई, नालासोपारा, आदि परिसरात काम करून रात्री रेल्वे स्टेशन व परिसरातील ठिकाणी झोपत असे.
आरोपी हा त्यांची आजी राहणार झांझरोली केळवा रोड परिसर येथे आजीस भेटण्यासाठी येणार असल्याची माहीती, केळवा सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व कार्यरत कर्मचारी यांना प्राप्त झालेली. केळवा सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री भीमसेन गायकवाड - सहा, पोलीस निरीक्षक, श्री सदाशिव गुंजाळ, श्री जयदीप सांबरे, पोलीस शिपाई व इतर कार्यरत कर्मचारी यांनी आरोपी असलेल्या घरास चहुबांजुनी घेरून आरोपीस अटक केली. आरोपीस अटक करून मा. न्यायालयात हजर केले असताना आरोपीस न्यायालयाने १६ जुलै २०२१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार करीत आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...