Friday, June 11, 2021

नाशिक पेलिकन पार्क रस्त्यावर वॅगन-आर आणि इटिऑस कार यांच्यात जोरदार अपघात : सुदैवाने जीवितहानी टळली.

नाशिक पेलिकन पार्क रस्त्यावर वॅगन-आर आणि इटिऑस कार यांच्यात जोरदार अपघात : सुदैवाने जीवितहानी टळली.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

राणेनगर येथुन कामानिमित्त सातपूर येथे निघालेली वॅगन-आर आणि इटिऑस कार यांच्यात पेलिकन पार्कच्या रस्त्यावर अपघात झाला. या घटनेत वॅगन-आर दोन ते तीन वेळा उलटली परंतु चालक बचावला.
चेतनानगर येथील रहिवासी प्रणव रघुनाथ दास (वय ५६ ) हे वॅगन-आर कारने (एमएच-१५, व्हीबी-३०७३) कामानिमित्त सातपूरकडे निघाले होते. राणेनगरकडून जात असताना पेलिकन पार्कजवळ समोरून येणाऱ्या इटीयॉसने (एमएच-१५, डीएम-५१७९) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, वॅगन-आर कार दोन ते तीन वेळा उलटली व यात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जिवीतहानी टळली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...