रेती तस्करांचे, जिल्हा अधिकारी यांनी मनाई केलेल्या क्षेत्रात उत्खनन व वाहतूक !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) पश्चिम रेल्वेच्या वैतरणा खाडीवरील ब्रिज नंबर ९२ व ९३ च्या ठिकाणी व परिसरात ब्रिज खालून नौकानयन, वाहतूक व रेती उत्खननास मा. जिल्हा अधिकारी पालघर. यांचे मनाई आदेशांचे उल्लंघन करून मौजे कांदरवन ता,जि पालघर येथील बोट मालक स्वतःच्या फायद्यासाठी, कोणत्याही प्रकारचा गोणखणिज उत्खनन व वाहतूक परवाना नसताना, चोरीच्या इराद्याने जिल्हाधिकारी साहेब पालघर. यांच्या मनाई आदेशांचा भंग करून रेती उत्खनन व वाहतूक करीत असल्याची माहिती, महसूल विभागाच्या स्थानिक अधिकारी वर्गास मिळून आली असताना, श्री रत्नदीप दळवी तलाठी सजा करवाळे, ता,जि पालघर. श्री किरण जोगदंड तलाठी सजा जलसार ता,जि पालघर. केळवा सागरी पोलीस ठाणे येथील कार्यरत पोलिस कर्मचारी. श्री भीमराव शिरसाठ पोलीस नाईक, श्री जयदीप सांबरे पोलीस काॅन्सटेबल, श्री सोमनाथ धनवट पोलीस काॅन्सटेबल. व वैती पाडा गावांचे ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहकार्याने दिनांक २ जून २०२१ रोजी पश्चिम रेल्वेच्या वैतरणा खाडीवरील ब्रिज नंबर ९२ व ९३ च्या परिसरात रेती उत्खनन व वाहतूक करण्यासाठी मनाई असतानाही उत्खनन व रेती वाहतूक करताना मिळुन आला असताना कारवाई करण्यात आली
बोट मालक गजानन हशा पाटील राहणार कांदरवन ता,जि पालघर यांच्या मालकीची, रेती वाहतूक करणारी बोट ( फायबरची )अंदाजे किंमत १,५०,००० /-रूपये अक्षरी एक लाख पन्नास हजार रूपये व दोन ब्रास रेती अंदाजे किंमत १९,७ ५८ /- रूपये अक्षरी एकोणीस हजार सातशे ऐशी रूपये एकुण १,६९,७५८ /-रूपये अक्षरी एक लाख एकोणसत्र हजार सातशे अठ्ठावन्न रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि,न ३६ / २०२१ ने व भा,दं,वि,सं, कलम ३७९, १८८, ३४ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ ( ७ ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून केळवे सागरी पोलीस ठाणे. प्रभारी अधिकारी श्री भीमराव गायकवाड सहा,पो अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री भीमराव शिरसाठ पोलीस नाईक पुढील तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment