*मुदतबाह्य सॅनिटायजर वाटप प्रकरणी ग्रामसेवकांची एक वार्षिक वेतन वाढ बंद*
जव्हार (प्रतिनिधी)जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे खु. येथे मुदतबाह्य सॅनिटायजर वाटपा बाबत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमी च्या अनुषंगाने गट विकास अधिकारी जव्हार यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता ग्राम पंचायत न्याहाळे खु. येथील ग्रामसेवक गणेश वामन एकल यांच्याकडून मालाची वैधता न तपासणे, वाटपा बाबत अति घाई साठा नोंद वहीत नोंद न घेणे, ई टेंडरिंग न करता कोटेशन पद्धतीने खरेदी करणे अशा प्रकारे बेजबाबदारपणा,निष्काळजी व हयगय झाल्याचे आढळून आल्याने ग्राम सेवकाने दुर्लक्ष केल्यामुळे जनतेच्या आरोग्या बाबतच्या प्रश्ना बाबत निष्काळजी पणा असे आरोप ठेवण्यात आले असून ग्रामसेवक एकल यांना म.जि.प.जि.से. (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग करून आपले कर्तव्य परायणता, जबाबदारी यात कसूर केलेली असल्याने म. जि.प.जि.सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ४ (२) नुसार एकल यांची एक वार्षिक वेतन वाढ (परिणाम न करणारी) बंद करण्यात आली असल्याचे गट विकास अधिकारी जव्हार यांनी कळवले आहे.
No comments:
Post a Comment