मालेगाव (प्रतिनिधी)मातीशी घट्ट नातं असलेले राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना चिंचावड गावातील शेतकऱ्याच्या शेतात पेरणी केली. गावाजवळून जात असताना मंत्री भुसे यांना शेतकरी पेरणीची तयारी करताना दिसून आले. त्यांनी तिकडे धाव घेऊन औत हातात घेतले आणि पेरणीला सुरुवात केली. राज्याचे कृषी मंत्री थेट शेतात येऊन पेरणी करताहेत हे पाहून परिसरातल्या शेतकऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री श्री. भुसे म्हणाले, जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी करा, शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा तुटवडा जाणवणार नाही याची खबरदारी शासनाने घेतल्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment