Monday, June 14, 2021

एक यशस्वी स्वॉफ्ट वेअर इंजिनियर (सेलफोर्स )यतिष किशोर पाटील

एक यशस्वी स्वॉफ्ट वेअर इंजिनियर (सेलफोर्स )यतिष किशोर पाटील
भिवंडी(स्व.रा.तो)
दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री किशोर बळीराम पाटील व सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था शिवाजीनगर मंडई भाजी मार्केट शाखेच्या शाखाधिकारी सौ.संगिता किशोर पाटील यांचे सुपुत्र कुमार यतिष किशोर पाटील याचा सिल्वर ज्युबळी  (२५ वा )वाढदिवस आज बुधवार दि.१६/६/२०२१ रोजी आहे.वाढदिवस साजरा करण्यात येणार नसला तरी त्यांनी २५ वर्षात काय केले हे सांगणे महत्वाचे आहे. दहावी पर्यंत त्याचे शिक्षण होली मेरी कॉन्व्हेन्ट हायस्कूल अंजुर फाटा येथे झाले.तर बारावी पर्यंतचे शिक्षण हे बी.एन.एन.महाविद्यालय भिवंडी येथे झाले.त्यानंतर शिकणाचे माहेर घर म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे नगरीतील डी. वाय.पाटील. इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन  स्वॉफ्ट वेअर इंजिनियरिंग  प्रथम श्रेणी मध्ये पास झाला. तिथुनच त्याला अहमदाबाद येथे नोकरी मिळाली. स्वतःची जिद्द , चिकाटी व शिक्षणाची आवड असल्याने तो आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. त्यानंतर त्याला पुणे येथे नामांकित कंपनीत नोकरी मिळाली व तेथे आता तो काम करत आहे. तिथे काम करत असताना सुध्दा त्याला आता अनेक कंपन्यांमध्ये  मोठ्या प्रमाणात नोकरी साठी कॉल येत आहेत.यावरून त्यांनी त्याच्या २५ वर्षाच्या कालावधीत यशस्वी कामगिरी केली आहे असं म्हणायला वावग ठरू नये. त्याजबरोबर त्याला लहानपणापासून कार्टून चित्रे काढन्याची आवड आहे तो सुंदर कार्टून चित्र काढतो त्याला मराठी वर्तमान पत्र सामनाच्या  कला दालनात 
उत्कृष्ठ चित्र काढल्यामुळे पारितोषिक मिळाले आहे.आता त्यांनी भरपुर कार्टून चित्रे काढली आहेत. त्याच्या या यशस्वी कामगिरीत आई वडिलांचे मोठे योगदान आहे.हेही तितकेच खरे आहे. आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रबळ इच्छाशक्ती मुळे तो एक यशस्वी स्वॉफ्ट वेअर इंजिनियर ( सेलफोर्स)  झाला आहे.त्याला २५ व्या(सिल्वर ज्युबळी) वाढदिवसा निमित्त  दैनिक स्वराज्य  तोरण व दिग्गज वार्ताहर  परिवाराकडून  पुढील वाटचलीसाठी मनःपूर्वक  हार्दिक खुप खुप  शुभेच्छा.....

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...