Sunday, June 13, 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उणिवा लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी प्रशासनाची तयारी सुरू : पालकमंत्री छगन भुजबळ.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उणिवा लक्षात घेऊन तिसऱ्या  लाटेच्या नियंत्रणासाठी प्रशासनाची तयारी सुरू : पालकमंत्री छगन भुजबळ.  
 प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

नाशिक जिल्ह्यात तिसर्‍या लाटेत सुमारे एक लाख २५ हजार बालक कोरोनाबाधित होऊ शकतात. पण त्यातील जेमतेम पाच टक्के बालकांना संस्थात्मक क्वारंटाइन करावे लागण्याचा प्रशासनाचा अंदाज असून, त्यासाठी बाराशेहून अधिक बेडची तयारी पूर्णत्वास आली आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत शनिवारी दुसऱ्या लाटेतील निर्बंध शिथिल करण्यासोबतच तिसऱ्या लाटेला तोंड देण्याच्या अनुषंगाने तयरीचा आढावा घेतला गेला त्यात ही माहिती पुढे आली.
बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स
प्रशासनाने तिसऱ्या लाटेत बालकांची काळजी घ्यावी लागणार म्हणून शहर-जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांचा कृतिदल स्थापन केला आहे. तसेच आत्तापर्यंत खासगी ४५०, बिटको १००, ग्रामीण ३५० याप्रमाणे ९०० ते एक हजार २०० बेडची सोय केली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हाभर ऑक्सिजन प्लांटची सोय केली आहे. १०० टन ऑक्सिजन जिल्ह्याची क्षमता असून, त्यापैकी ६० टन जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातच तयार होणार आहे. त्यामुळे संस्थात्मक केंद्रात उपचारांची गरज असलेल्या पाच टक्के बालकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...