* *बोईसर विधानसभा आमदार श्री राजेश पाटील यांनी मदत कार्य करत वाढदिवस साजरा केला,,,*
पालघर(प्रतिनिधी) दि 11 जून: कोरोना च्या दुसऱ्या लाटेने बऱ्याच कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त केल्यामुळे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ठिकाणी वेगवेग ळ्या पद्धतीने मदत कार्य करत आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
आज सकाळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय जवळ ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील आणि संपूर्ण संचालक मंडळ यांच्या समवेत जिल्ह्यासाठी अद्ययावत अशी रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार पाटील यांनी केले.
त्याचप्रमाणे भाताणे येथे उपसरपंच प्रणय कासार,सरपंच निशा बरफ,कांचन मालवी,माजी सभापती पंचायत समिती वसई सुगंधा जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना सायरे यांच्या सोबत ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले,,,,,
भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात येथी वैद्यकीय अधिकारी डॉ यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला,,,, भारोळ येथे, पर्यावर बहुउद्देशीय संस्था यांच्या सोबत वृक्षारोपण करून पर्यावरणाचा होणारा ह्रास थांबवण्यासाठी झाडे लावून झाडे जगवणे हे सगळ्यात महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद करत लावलेली झाडे जगली पाहिजेत यासाठी लक्ष देण्याची विनंतीही आयोजकांना त्यांनी केली.
भालीवली येथे नागरिकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप सुद्धा करण्यात आले तौक्ते चक्रीवादळामुळे दातिवरे, कोरे, नानिवली येथे घराचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना सिमेंटचे पत्रे वाटप करून त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करून आपला वाढदिवस साजरा केला कोरोनाचे संकट असताना कुठेही बॅनरबाजी न करता सामाजिक काम करून वाढदिवस साजरा करण्याचा नवा पायंडा आमदार पाटील यांनी आपल्या मतदार संघात पाडला असून त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
यावेळेस त्यांच्यासोबत,ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील, माजी खासदार बळीराम जाधव आमदार सुनिल भुसारा आमदार श्रीनिवास वनगा बहुजन विकास आघाडी तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, नागेश पाटील,पालघर जिल्हा उप अध्यक्ष विश्वनाथ घरत, जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांमडी, पी टी पाटील, अनिस शेख, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment