Friday, June 11, 2021

मौजे -- गांजा - ढेकाळे अनियमित वीजपुरवठा ? मा. राजेंद्र गावीत साहेब, खासदार पालघर, कार्यकारी अभियंता पालघर व गांजा - ढेकाळे ग्रामस्थ बैठक संपन्न.

मौजे -- गांजा - ढेकाळे अनियमित वीजपुरवठा ?
   मा. राजेंद्र गावीत साहेब, खासदार पालघर, कार्यकारी अभियंता पालघर व गांजा - ढेकाळे ग्रामस्थ बैठक संपन्न. 
 सफाळे ( हिरालाल लोखंडे ) जंगल पट्टीत वसलेल्या गांजा ढेकाळे गाव लगतचा परिसरात अनेक दिवसापासून अनियमित पणे वीजपुरवठा होत असून सुध्दा विज ग्राहकांना वेळेवर विज देयके ( बिल ) मात्र वेळेवर येत आसतात. वीजपुरवठा रोज नियमीत पणे सुरू राहील हे मात्र, महाराष्ट्र विद्युत मंडळाचा कोणताही अधिकारी - कर्मचारी सांगु शकत नसल्याने, गांजा ढेकाळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ यांनी मा. राजेंद्र गावीत साहेब यांची प्रत्येक भेट घेऊन गावातील विज पुरवठा नियमित पणे होण्यासाठी लक्ष देण्याची विनंती केलेली. 
  दिनांक १० जून २०२१ रोजी मा. राजेंद्र गावीत साहेब यांनी आपल्या पालघर येथील निवास स्थानी, गांजा ढेकाळे ग्रामस्थ, श्री अरुण मचिये कार्यकारी अभियंता  पालघर, यांच्या सह बैठकीचे आयोजन केले. अनियमित विज पुरवठा होण्याची कारणे, ढेकाळे फिडर मधे कर्मचारी कमी. आठ टॅब लाईन, अंदाजे साठ किलो मीटर लांबीच्या विज वाहिन्या, जीर्ण झालेले पोल, आदि तांत्रिक अडचणी मुळे ढेकाळे फिडर विज पुरवठा वारंवार खंडित होत आसतो. तोक्ती वादळाच्या नंतर आठ दिवस ढेकाळे फिडर नादुरुस्त अवस्थेत होते. यामुळे ढेकाळे फिडर वर अवलंबून असलेल्या विज ग्राहकांची गैरसोय होत आहे. 
वरील परिस्थिती पाहता, महामार्गा लगत, नवीन उपकेंद्र उभारणी करणे, ढेकाळे फिडरची विभागणी करून, तिन ते चार नवीन फिडर उभारणे, जेणे करुन विज पुरवठा वारंवार खंडित होणार नाही. अश्या प्रकारची मागणी विनया पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या, विकास पाटील माजी सरपंच, रामदास बोंड, सुदर्शन गवळी, अमेय पाटील आदि ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्या मागणी अनुसार, नवीन उपकेंद्र उभारणीसाठी महामार्गावर लगत तातडीने जागेचा शोध घेऊन, नवीन उपकेंद्र उभारणी करणे या साठी मा. खासदारांनी सांगितले असताना श्री अरुण मचिये कार्यकारी अभियंता पालघर यांनी लवकरच महामार्गालगत नवीन उपकेंद्र उभारणी कामी, जागेचा शोध घेणे कामी श्री संजय कोल्हे उपविभागीय अभियंता यांना पाठविण्यात येणार असल्याचे सर्वांसमक्ष मा. खासदार साहेबांना सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...