Wednesday, June 2, 2021

मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे


  मागासवर्गीयांना  पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे
पालघर (प्रतिनिधी)दि. 02/06/2021 रोजी मागासवर्गीय पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळण्याबाबतचे वरील निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रक राज्य, मुंबई द्वारा मा. जिल्हाधिकारी, पालघर यांच्या मार्फत देण्यात आले पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क असून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचे निर्देश दिले असताना सुध्दा महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण नाकारले असून या घटनेचा रिपाई (आ) पालघर जिल्हयाच्या वतीने जाहिर निषेध करून मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसरकारने त्वरित घ्यावा. अशा मागणीचे व पालघर दुर्गम जिल्हयात सन 2017 पासून नोकर भरती न झाल्याने जिल्हयातील युवक बेरोजगार झाले आहेत. तरिही पालघर जिल्हयात विविध कार्यालयात नोकरभरतीचे आदेश देण्यात यावे या मागणीचे सुध्दा निवेदन मान्यवरांना देण्यात आले त्यासमयी पालघर जिल्हाध्यक्ष मा सुरेश जाधव, उपा. कुंदन मोरे, ता. युवा अध्यक्ष शरद जाधव, उपा. जागृत जाधव, पा.शहर, उपा.राम ठाकूर, संघटक सचिन घाडीगावकर इ. मान्यवर मा. जिल्हाधिकारी साहेब पालघर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...