कोव्हिड १९ जनजागृती रथावर दहशतवादी हल्ला ?
डॉक्टर व जि. प. आरोग्य कर्मचारी जखमी !
महाराष्ट्र जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी, संघटनेचा न्याय न मिळाल्यास असहकार आंदोलन इशारा ?
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) महाराष्ट्र शासनाने कोव्हिड १९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लसीकरणाच्या जनजागृती अनुषंगाने दिनांक ०१ जून २०२१ रोजी,जिल्हापरिषद पालघर,आरोग्य विभाग पंचायत समिती पालघर, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेस ता,जि पालघर येथील डॉक्टर - आरोग्य कर्मचारी मौजे गांजे - ढेकाळे हद्दीतील वांद्री डॅम जवळ त्याच्या ताब्यातील पोस्टर लावलेला जनजागृती चित्ररथ ( इको कार एम एच ४८ बी एन ५०७ ) सह जनजागृती करीत असताना. सायंकाळी अंदाजे ४ वाजण्याच्या सुमारास खालील नावे असलेल्या,१) अजय जयराम अंधेर २) विवेक श्रावण बरफ ३) संजय कृष्णा घोडा ४) संदेश रामा धोडी ५) लक्ष्मण सुरेश भोये ६) जयेश रूपा धोडी ७) प्रवीण सखाराम धोडी ८) बाळकृष्ण काशिनाथ वरठा ९) अजय कृष्णा धोडी सर्व राहणार जायशेत बहिरी फोंडा ( मौजे गांजे - ढेकाळे परिसरात) ता,जि पालघर. जनजागृती चित्र रथ अडवून, आमच्या कडे तुम्ही कोणाच्या आदेशाने आलात. करोना गावात पसरविण्यासाठी आले आहात. असे सांगून चित्ररथा सोबत असलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी १) प्रकाश बाबासाहेब कवडे - डॉक्टर वय २५ वर्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेस, २) हरेश्वर मधुकर पाटील -चित्ररथ चालक वय ४५ वर्षे, ३) शरद पांडूरंग मिरका वय ३५ वर्ष ग्रामपंचायत ढेकाळे शिपाई, ४) दिनेश कृष्णा पाटील वय ५० वर्ष आरोग्य सेवक, ५) सुर्दशना सुबोध सातवी वय ४० वर्ष आरोग्य कर्मचारी याना शिवीगाळ दमदाटी धमकवीत लाथा बुक्यांनी मारहाण करीत,जनजागृती चित्र रथाचे पोस्टर फाडून गाडीचे नुकसान केले आसताना, पोलीस ठाणे मनोर ता,जि पालघर येथे डॉक्टर प्रकाश कवडे यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्ह्यांची नोंद मनोर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि,न १०८ / २०२१ प्रमाणे व भा,दं,वि,स,कलम ३५३, ३३२, ३४१, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४६,१४७,१४९,१८८, ४२७ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम ५१ ब, सह कोव्हिड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ तसेच महा, वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था ( हिंसा कृत्य ) व मालमत्तेची हानी नुकसान या प्रतिबंध कायदा कलम २०१० चे कलम ३,४, प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून तपासी अंमलदार श्री अजित कणसे सहा. पोलीस उपनिरीक्षक मनोर पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर, श्री प्रताप दराडे प्रभारी अधिकारी मनोर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करित असून, घटना स्थळास श्री विलास नाईक मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर, श्री दराडे साहेब सास, पोलीस निरीक्षक मनोर, यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील कारवाई सुरू आहे. काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
घडलेल्या घटने बद्दल महाराष्ट्र जिल्ह परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने तिव्र निषेध करून, मा. जिल्हा अधिकारी पालघर, यांना आरोग्य विभागाच्या जन जागृती रथावरील हल्या प्रकरणी न्याय मिळणे बद्दल लेखी निवेदन देऊन, चित्ररथ गांव पाड्यावर फिरवताना / ग्राम स्तरावर लसीकरण सत्राच्या ठिकाणी / अॅन्टीजन टेस्ट कॅम्प वेळी पोलीस संरक्षण मिळावे व रूग्ण शोधण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत / महसूल विभाग यांचा सक्रीय सहभाग असावा.तसेच घडलेल्या प्रकाराची तात्काळ चौकशी करून, आरोग्य कर्मचारी यांना न्याय मिळावा. अन्यथा संवर्गातील अधिकारी कर्मचारी असहकार आंदोलन पुकारतील असाही इशारा जिल्हा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांना महाराष्ट्र जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री बालाजी सातपुते यांनी लेखी स्वरूपात निवेदन दिलेले आहे
No comments:
Post a Comment