Sunday, June 6, 2021

जिल्हाभरात शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


*जिल्हाभरात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा*
  
 पळघा (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या परीपत्रकान्वये ६ जून रोजी 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यात  यावा असे सूचित करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्यभिषेक करून घेतलेला हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस असून अशा या भूमिपुत्रांचे स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राम पंचायत व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे परिपत्रकात म्हटल्या प्रमाणे आज दि.६ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांच्या हस्ते  वित्त व बांधकाम समिती सभापती काशिनाथ चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भगवा स्वराज्य ध्वज असलेली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. अध्यक्षा भारती कामडी यांनी यावेळी उपस्थित सर्वांना शिवराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
यावेळी प्रकल्प संचालक माणिक दिवे, उ.प.मु.का.अ.(सा.) संघरत्ना  खिल्लारे, सर्व विभाग प्रमुख,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 प्रत्येक पंचायत समिती मध्ये सभापतींच्या हस्ते तर ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या हस्ते किंवा सदस्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...